ही बाई फड उभा करून कमळाबाईची सुपारी वाजवते; शिवसेनेने राणांची लाज काढली

Navneet Rana| Sanjana Ghadi| तुमच्यासारख्या 100 दुश्मनांच्या छाताडावर उभी राहून पुन्हा एकदा या मुंबई महाराष्ट्रावर आपला भगवा डौलाने फडकत ठेवणार आहे.
Navneet Rana| Sanjana Ghadi|
Navneet Rana| Sanjana Ghadi|

मुंबई : नवनीत राणा जरा तोंड सांभाळून बोला. कोण आहात आपण 'सी' ग्रेड फिल्ममध्ये काम करणाऱ्या एक अभिनेत्या. एक आमदार आपल्यावर भाळला आणि राजकारणात आपला चंचू प्रवेश झाला. अशा शब्दांत शिवसेना (Shivsena) प्रवक्त्या संजना घाडी यांनी नवनीत राणांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.

हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) पठण करू न दिल्यामुळेच राज्यातील उद्धव ठाकरे (Uddhav Thackray) यांचे सरकार पडले, ही तर सुरवात आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरेंचा सर्वनाश होणार, अशी टीका खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले होते. या टीकेनंतर संजना घाडी यांनी नवनीत राणांवर आगपाखड केली आहे.

Navneet Rana| Sanjana Ghadi|
Ambadas Danve: अमित शहांचे मुंबईप्रेम हे बेगडी आहे

संजना घाडी म्हणाल्या की, काय संबंध आपला हनुमान चालीसा शी. हनुमानाला हनुमान का म्हणतात? याचं साधं उत्तर मुलाखतीमध्ये आपल्याला देता आलं नाही. म्हणे मी हनुमान भक्त. भाजपाच्या सी, डी, टीम म्हणून काम करणाऱ्या मनसेने भोंग्यांच्या विषयासाठी मशिदीसमोर हनुमान चालीसा वाचा म्हणून सांगितलं. तर तुम्ही डायरेक्ट मातोश्रीवर हनुमान चालीसा वाचायला निघालात. ज्या बाईला लाखो शिवसैनिकांचे श्रद्धास्थान असलेलं मातोश्री या मंदिरातला आणि मशिदीतला फरक कळत नाही त्या बाईला आणखी कशी वागणूक मिळायला पाहिजे होती.

तुम्ही म्हणालात शिवसेनेने काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर आघाडी केली वगैरे वगैरे. म्हणून मातोश्री आणि मातोश्रीचे विचार हिंदुत्ववादी राहिले नाहीत. बाळासाहेबांचे राहिले नाहीत. पण याच मातोश्रीवर माननीय बाळासाहेबांनी मुस्लिम कुटुंबीयांना त्यांची नमाजाची वेळ झाल्यानंतर नमाज अदा करण्याची विनंती केली होती आणि त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत नमाज अदा केला देखील. हे तुमच्यासारख्या "मुंबईची मुलगी' म्हणून घेणाऱ्या बाईला माहिती पाहिजे. ही मुंबईची मुलगी कदाचित त्यावेळी" C" ग्रेड फिल्म करण्यात बिझी होती. आणि आता फड उभा करून कमळाबाईची सुपारी वाजवते. हे महाराष्ट्र आणि मुंबईला पक्के कळाले आहे. अशी घणाघाती टीकाही त्यांनी यावेळी केली.

इतकेच नव्हे तर, कावळीणीच्या शापाने गाय मरत नसते बाई..! त्यामुळे माझ्या शापामुळे माझ्यावर झालेल्या अन्यायामुळे शिवसेनेला कार्यकर्ता उरला नाही, अशा फाजील वल्गना करून अशी थेरं महाराष्ट्राला दाखवू नका. शिवसेना ही कालही मजबूत होती आजही मजबूत आहे आणि तुमच्यासारख्या 100 दुश्मनांच्या छाताडावर उभी राहून पुन्हा एकदा या मुंबई, महाराष्ट्रावर आपला भगवा डौलाने फडकत ठेवणार आहे. कितीही शूर्पणखा अंगावर आल्या तरी त्यांची नाक कापून, अशा सणसणीत शब्दात प्रवक्त्या संजना घाडी यांनी नवनीत राणांवर आगपाखड केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com