हिंदुत्वाचा हुंकार! शिवसेना डरकाळी फोडणार; उद्धव ठाकरेंच्या सभेचा वादळी टीझर रिलीज

Shivsena| CM Uddhav Thackeray| MNS| मनसेला जशास तसे उत्तर देण्यासाठी येत्या 14 तारखेला शिवसेनेची विराट सभा होणार आहे.
हिंदुत्वाचा हुंकार! शिवसेना डरकाळी फोडणार;  उद्धव ठाकरेंच्या सभेचा वादळी टीझर रिलीज
CM Uddhav Thackeray

Shivsena releases teaser of Uddhav Thackeray's rally

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांनी गुडीपाडव्याच्या सभेपासून राज्यात सलग तीन सभा घेऊन राज्यातील वातावरण ढवळून काढलं. भोंग्यांचा मुद्दा हातात घेऊन राज ठाकरेंनी प्रखर हिंदुत्ववादाची भूमिका मांडली. गेल्या महिन्याभरापासून राज ठाकरेंनी आपल्या भोवतीच राजकारण फिरतं ठेवलं आहे. औरंगाबादच्या सभेत राज ठाकरेंनी अयोध्या दौऱ्याची घोषणा करताच शिवसेनेच्या (Shivsena) गोटात मोठी खळबळ उडाली आहे. (Shivsena releases stormy teaser of Uddhav Thackeray's rally)

त्यानंतर आता शिवसेनेनेही अयोध्या दौऱ्याची घोषणा केली आहे. मनसेला जशास तसे उत्तर देण्यासाठी येत्या 14 तारखेला शिवसेनेची विराट सभा होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) स्वत: या सभेला संबोधित करणार आहेत. शिवसेनेनेही या सभेपूर्वीच वादळी टीझर लॉन्च केला आहे. त्यामुळे शिवसेनेची सभाही वादळी होणार असल्याचं दिसत आहे.

CM Uddhav Thackeray
ठाकरेंना पुन्हा आव्हान देणं राणांना महागात पडणार? सरकारी वकीलांनी स्पष्टचं सांगितलं...

ठाकरेंना पुन्हा आव्हान देणं राणांना महागात पडणार? सरकारी वकीलांनी स्पष्टचं सांगितलं...शिवसेनेने सुरु केलेल्या शिवसंपर्क अभियानाचा एक भाग म्हणून ही सभा होणार आहे. येत्या 14 मे रोजी सायंकाळी 7 वाजता मुंबईतील बीकेसीवर शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत: सभेला संबोधित करणार आहेत. शिवसेनेच्या इतर नेत्यांचीही या सभेत भाषणे होणार आहेत. या सभेच्या माध्यमातून शिवसेना आगामी निवडणुकीचं रणशिंग फुंकणार असल्याचं म्हटलं जात आहे.

सभेपुर्वी शिवसेनेने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर 15 सेंकदाचा टीझर प्रसिद्ध केला आहे. आतापर्यंत चार हजार लोकांनी हा टीझर पाहिला आहे. तर 151 लोकांनी रिट्विट केला आहे. टीझरच्या सुरुवातीला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे भाषण आहे. मी शिवसेनाप्रमुख जरूर, पण तुमची ताकद माझ्यासोबत आहे. म्हणूनच मी शिवसेनाप्रमुख आहे, असं बाळासाहेब बोलताना दिसत आहेत. यासोबतच शिवसेना प्रमुखांच्या सभेतील या विधानानंतर कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला, अशा घोषणाही ऐकू येतात.

यासोबतच टीझरमध्ये, साहेबांवर श्रद्धा असणाऱ्या प्रत्येक शिवसैनिकाने खऱ्या हिंदुत्वाचा हुंकार ऐकायला यायलाच पाहिजे,' असं आवाहन निवेदकाकडून करण्यात आले आहे. शेवटी सभेची तारीख आणि वेळही दाखवण्यात आली आहे. तसेच या व्हिडीओमध्ये गर्दीने भरलेली शिवसेनाप्रमुखांची सभा, त्यांचं भाषण आणि उद्धव ठाकरे यांची सभा दाखवण्यात आली आहे. सोबतच शिवसेनेचे भगवे झेंडे घेऊन येणारे शिवसैनिकही दिसत असून शेवटी वाघाची डरकाळीही ऐकू येते. एकंदरीतच शिवसेनेने या सभेची जोरदार तयारी सुरु केल्याचं दिसत आहे.

14 मे रोजी मुंबईत होणाऱ्या या जाहीर सभेसाठी मुंबईत शिवसेनेकडून वातावरण निर्मिती करण्यास सुरूवात झाली आहे. संपूर्ण मुंबईत या जाहीर सभेची भव्य होर्डिंग्ज लावण्यात आली आहेत. विषेश म्हणजे होर्डिंग्जवर, खऱ्या हिंदुत्वाचा हुंकार ऐकायला... ' यायलाच पाहिजे,अशा घोषवाक्यांतून भाजप आणि मनसेवर निशाणा साधला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.