रेड्यांच्या मतांवर निवडून आलेला 'महारेडा' असतो : बंडखोरांचा संजय राऊतांना टोला...

बाळासाहेब ठाकरे साहेब Balasaheb Thackeray असते तर ही महाविकास आघाडीच Mahavikas Aghadi झाली नसती. भाजप BJP व शिवसेनेचे Shivsena युतीचे Yuti सरकार २०१९ मध्ये सत्तेत आले असते, असे त्यांनी स्पष्ट केले.
Shambhuraj Desai, Sanjay Raut
Shambhuraj Desai, Sanjay Rautsarkarnama

मुंबई : आदल्यादिवशी आमची मते घेतली, त्यांना निवडून आणलं आणि दुसऱ्यादिवशी आम्ही रेडे कसे झालो. मुळात रेड्यांच्या मतांवर निवडून आलेला कोण तर 'महारेडा' असतो, असा टोला आमदार शंभूराज देसाई यांनी संजय राऊत यांना लगावला.

बंडखोरी केलेल्या आमदारांवर शिवसेनेच्या नेत्यांनी खालच्या पातळीवर टीका केली. बंडखोर आमदारांना रेड्याची, गटाराची, प्रेतांची उपमा दिली. यासंदर्भात एका वृत्तवाहिनीशी बोलताना आमदार शंभूराज देसाई म्हणाले, रेड्यांच्या मतांवर निवडून आलेला कोण तर 'महारेडा' असतो. आदल्यादिवशी आमची मते घेतली, त्यांना निवडून आणलं आणि दुसऱ्यादिवशी आम्ही रेडे कसे झालो, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

Shambhuraj Desai, Sanjay Raut
चाळीस रेडे काय करू शकतात याचे प्रायश्चित्त त्यांना मिळाले....शंभूराज देसाई

आमचे शहाजी बापू म्हणतात की, तो महारेडा आहे. पण, ज्यांनी आमच्यावर टीका केली त्यांना त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागले. माझी आदित्य ठाकरेंना व उद्व साहेबांना विनंती आहे. त्यांनी संजय राऊतांची भाषा शिकू नये. त्यांच्यापासून सुरक्षित अंतर ठेऊन राहावे. शिवसेनेचे नेमके काय चुकले, यावर शंभूराज देसाई म्हणाले, आमचे ऐकुणच घेतले जात नव्हते. राष्ट्रवादीच्या आहारी गेल्यासारखे त्यांचे काम झाले होते.

Shambhuraj Desai, Sanjay Raut
मुर्मू यांनाच पाठिंबा : सेनेच्या सर्व खासदारांची स्पष्ट भूमिका, संजय राऊत एकाकी!

त्यांनी आमदारांचं ऐकूण घेत अडचणी, प्रश्न सोडविले नाहीत. सहज भेटही मिळत नव्हती. हे सर्व साचत गेले. जेव्हा आमच्या सहनशिलतेच्या पलिकडे गेलं त्यातून उद्रेक झाला. आता स्वगृही येण्याचे ठरले तर काय भूमिका राहिल, यावर शंभूराज देसाई म्हणाले, शिवसेनेच्या नेतृत्वाने आपल्या कामाच्या पद्धतीत बदल करावा. ते आजारी होते, प्रकृती चांगली नव्हती. आज विश्वासाने सांगतो ५५ आमदारांचे गट नेते एकनाथ शिंदे होते.

Shambhuraj Desai, Sanjay Raut
सातारचा पालकमंत्री कोण : शिवेंद्रसिंहराजे की शंभूराज देसाई

त्यांनी त्यांना सांगितले असते तरी त्यांनी निर्णय घेतला असता आणि ही वेळ आली नसती. या ठिकाणी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेब असते तर त्यांनी अधिकार वाणीन आम्हाला बोलवून घेतलं असतं. आपला प्रश्न आपण घरात बसून योग्य पध्दतीने संपवू. एकवेळ दरडावले असते आणि जवळही घेतले असते. सध्या आम्हा सर्व आमदारांना बाळासाहेब ठाकरे साहेबांचीच उणीव भासते आहे.

Shambhuraj Desai, Sanjay Raut
Hingoli: शिवसेना आक्रमक; संतोष बांगर यांची जिल्हाध्यक्ष पदावरुन हकालपट्टी

बाळासाहेब ठाकरे साहेब असते तर ही महाविकास आघाडीच झाली नसती. भाजप व शिवसेनेचे युतीचे सरकार २०१९ मध्ये सत्तेत आले असते, असे त्यांनी स्पष्ट केले. आता तुम्ही परत फिरणार का, यावर शंभूराज देसाई म्हणाले, आम्हाला रेडे, गटारातील पाणी, प्रेतं, गद्दार असे संबोधले. हे कोणीही विसरणार नाही. पण, उद्धव ठाकरे आमचे नेते असून त्यांच्याविषयी आम्हाला आदर आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व आमचे नेते एकनाथ शिंदे साहेबांशी बोलून युतीला आशिर्वाद द्यावा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in