उद्धव ठाकरे आणि संभाजीराजे समेट : शिवसेना पुरस्कृत म्हणून राज्यसभेत जाणार

संभाजीराजे (Sambhajiraje) यांना शिवसेना पाठिंबा देणार की नाही, याची उत्सुकता होती.
sambhajiraje-meets-cm
sambhajiraje-meets-cmsarkarnama

मुंबई : संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje) आणि शिवसेना यांच्यात समेट झाला असून राज्यसभेसाठी शिवसेना पुरस्कृत उमेदवार म्हणून राजेंना राज्यसभेत पाठविण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thacekray) यांनी मान्यता दिली आहे. मला शिवसेना नको तर महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून घोषित करा, अशी संभाजीराजे यांची मागणी ठाकरे यांनी अखेर मान्य केली.

संभाजीराजे शिवसेना पुरस्कृत उमेदवार यासाठी उद्धव ठाकरे सकारात्मक असल्याने या वादावर तोडगा निघाला आहे. संभाजीराजे माध्यमांशी बोलणार असून याबाबत ते अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे.

sambhajiraje-meets-cm
राज ठाकरे अयोध्या दौरा: शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीनेही मनसेला डिवचलं

संभाजीराजे यांनी शिवसेनेत प्रवेश करावा, यासाठी सेनेचे नेते प्रयत्न करत होते. शिवसेनेने अपक्ष आमदारांनाही गळाला लावण्याचा प्रयत्न केला. संभाजीराजे हे शिवसेनेचे २२ वे आमदार म्हणूनच कार्यरत राहतील, अशी अट त्यांना ठेवण्यात आली होती. त्यावर राजे समाधानी नव्हते. एका पक्षाशी बांधिलकी त्यांना मान्य नव्हती. त्यामुळे सर्वपक्षीय किंवा महाविकास आघाडीचा एकमताने उमेदवारी घेण्यासाठी त्यांचा आग्रह होता. शिवसेनेने अखेर त्यांचा आग्रह मान्य केला आहे.

sambhajiraje-meets-cm
Video: Sarkarnama Face-Off Full Episode महाराष्ट्रातील राजकारणातील ड्रामा क्वीन कोण? पहा तरुण नेत्यांचा Faceoff

या दोघांत समेट झाल्याने राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सहाही जागा बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग खुला झाला आहे. राष्ट्रवादी, शिवसेना आणि काॅंग्रेस यांचे प्रत्येकी एक जण राज्यसभेवर सहज निवडून जाऊ शकतो. भाजपचे दोन जण राज्यसभेचे खासदार होऊ शकतात. सहाव्या जागेवर संभाजीराजे हे महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून दुसऱ्यांदा राज्यसभेचे खासदार होतील. या साऱ्या निवडणुकीवर तोडगा निघाल्याने अपक्ष आमदारांचा भाव कमी झाला आहे. निवडणूक होण्याच्या शक्यतेने दोन्ही बाजूंनी अपक्ष आमदारांशी संपर्क साधून त्यांनी पाठिंबा द्यावा,यासाठी फिल्डिंग लावण्यात आली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com