कॉंग्रेसला संपवण्यासाठी शिवसेनेने पद्धतशीरपणे प्लॅन आखलाय; महाविकास आघाडीत धुसफुस कायम

BMC Elelction| Shivsena|Congress| मंगळवारी (३१ मे) मुंबई महापालिका निवडणुकीसाठी वॉर्डनिहाय आरक्षण सोडत जाहीर झाली.
BMC Elelction| Ravi Raja news
BMC Elelction| Ravi Raja news

मुंबई: गेल्या आठवड्यात शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (ncp) आपल्या सोयीने प्रभाग रचना करत आहेत असा आरोप करत नाना पटोले यांनी आपल्याच सरकारविरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा दिला होता. तसेच मुंबईतल्या प्रभाग पुनर्रचनेबद्दलही नाना पटोले यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. तीन पक्षांचं सरकार आहे, तेव्हा सगळ्या पक्षांचं मत विचारात घेऊन वॉर्ड रचना व्हायला हवी. सोबत राहून आपल्या मित्राचंच नुकसान होत असेल तर ते बरोबर नाही. आमच्या स्थानिक प्रतिनिधींनी याबाबत नाराजी व्यक्त केल्याचेही नाना पटोले यांनी म्हटले होते. (BMC Election news)

त्यानंतर मंगळवारी (३१ मे) मुंबई महापालिका निवडणुकीसाठीवॉर्डनिहाय आरक्षण सोडत जाहीर झाली. मात्र यात काँग्रेसच्या (Ccongress) अनेक नगरसेवकांचे वॉर्ड आरक्षणात गेल्यामुळे कॉंग्रेसमध्ये नाराजी नाट्य सुरु झाले आहे. यावरुन आता काँग्रेस नेते आणि पालिकेतील माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी मुंबई पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्यावर गंभीर आरोप केल्यामुळे खळबळ माजली होती.

BMC Elelction| Ravi Raja news
नाना पटोलेंवर शिवसेना, राष्ट्रवादी अन् काँग्रेसही नाराज? आघाडीविरोधी वक्तव्यांमुळे रोष

तर दूसरीकडे वॉर्ड रचनेवरून काँग्रेस विरुद्ध शिवसेना असेही चित्र पाहायला मिळत आहे. मुंबईतून कॉंग्रेस संपवण्याचा डाव असल्याचा आरोप रवी राजा यांनी शिवसेनेवर केला आहे. नगरविकास खात्याच्या निर्देशावरुनच प्रशासनाने मुंबईतील वॉर्ड पुर्नरचना आणि आरक्षणात फेरफार करण्यात आली. वॉर्ड पुर्नरचना आणि आरक्षण सोडतीत शिवसेनेनं स्वत:चा फायदा करुन घेत काँग्रेसच्या जागांवर जाणून बुजून मोठे फेरफार केले. मुंबईत काॅंग्रेसच्या २९ नगरसेवकांपैकी २१ नगरसेवकांचे वॉर्ड आरक्षण सोडतीत विलीन केल्याचा आरोपही रवी राजा यांनी केली आहे.

तसेच, आसिफ झकेरिया, सुफियान वनु, कमरजहाॅं सिद्दीकी या मुंबईत काँग्रेसकडून चांगली कामगिरी करणा-या नगरसेवकांचे वॉर्ड आता अडचणीत सापडलेत. मुंबईत वॉर्ड आरक्षण सोडतीचा सर्वाधिक फटका काँग्रेसला बसला आहे. मुंबईत शिवसेनेकडून काँग्रेसचे खच्चीकरण केले जात असल्याचा आरोप रवी राजा यांनी केला आहे.

वॉर्ड पुर्नरचनेपाठोपाठ वॉर्ड आरक्षण सोडतीतही काॅंग्रेसवर अन्याय आणि शिवसेनेचा फायदा झाल्याची भावना कॉंग्रेसच्या मनात आहे. यावर येत्या आठवड्यात मुंबईत चिंतन शिबीर घेऊन मुंबईतील काॅंग्रेस नेते चर्चा करणार आहेत. तसेच शिवसेनेकडून जाणिवपूर्वक मुंबईत काँग्रेसची ताकद वाढु नये याकरता प्रयत्न होतायेत त्यावर तोडगा काढू, भाजप सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आघाडी केली तरी मुंबईत पक्ष संपता कामा नये, रवी राजा यांनी म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com