शिवसेनेचा दसरा मेळावा होणार, पण...

या वर्षी कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आल्याने यंदाचा दसरा मेळावा कसा होणार याकडे सर्व शिवसैनिकांचे लक्ष लागले होते.
Sanjay Raut
Sanjay Raut Sarkarnama

दरवर्षी दसऱ्याला शिवाजी पार्कवर (Shivaji park) भव्य दसरा मेळावा साजरा केला जातो. मात्र गेल्या दोन वर्षात शिवसेनेने (Shivsena) कोरोनाच्या पार्श्वभुमीवर छोट्या पद्धतीने साजरा होत आहे. या वर्षी कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आल्याने यंदाचा दसरा मेळावा (Dasara Melava) कसा होणार याकडे सर्व शिवसैनिकांचे लक्ष लागले होते. मात्र संजय राऊत यांनी यावर्षीचा दसरा मेळावा छोट्याच पद्धतीने होणार असल्याचे जाहीर केले आहे.

राज्यात कोरोना संसर्ग (Covid 19) आटोक्यात आला असला तरी कोरोना नियमांचं भान ठेवूनच उद्याचा दसरा मेळावा होणार आहे. गेल्या दोन वर्षात दसरा मेळावा (Dasara Melava) अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. शिवाजी पार्कवर (Shivaji Park) दरवर्षी शिवसेनेची (Shivsena) रॅली असते. या रॅलीला लाखो लोक उपस्थित राहतात. पण कोरोनामुळे दोन वर्ष रॅली झाली नाही. यंदाही शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार होते, पण मेळावा खुल्या मैदानात घेतला आणि हजारो लोक जमा झाले तर कोरोना नियमांचा भंग होऊ शकतो. त्यामुळे षण्मुखानंदमध्ये यावर्षीचा दसरा मेळावा घेण्याचं ठरवलं आहे. या मेळाव्यात शिवसेनेची मुलूखमैदानी तोफ धडाडणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) देशाच्या, राज्याच्या राजकीय घडामोडींवर ते भाष्य करतील. अशी माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.

Sanjay Raut
सना मरिन: जगातील सर्वात लहान महिला पंतप्रधान

तसेच, देशात इंधनाचे दर दररोज उच्चांक गाठत आहेत. या महागाईचा राक्षस 2024मध्ये आपल्याला जाळायचा आहे. त्याची सुरुवात उद्यापासून करायची असल्याचं सूचक विधान यावेळी संजय राऊतांनी केलं. यावेळी त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावरही निषाणा साधला. चंद्रकांत पाटील यांना जे बोलायच आहे ते बोलूद्या त्यांना कोणीही गांभीर्याने घेत नाही. चंद्रकांत पाटलांच्या बोलण्याने महाराष्ट्राला काहीही फरक पडत नाही. विरोधी पक्ष तोंडाच्या वाफा दवडत आहे, दवडू द्या त्यांना असा घणाघाती हल्लाही त्यांनी केला. याशिवाय त्यांनी मनसेलाही टोला लगावला आहे.राज्यातील लोकांना दोन वर्षात काही काम-धंदा उरलेला नाही. राज्यात एक नाटक चळवळ सुरू झाली आहे. त्या नाटक चळवळीलाही उद्याच्या दसरा मेळाव्यातून उत्तर देऊ, असा टोला त्यांनी मनसेला लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com