मी शिवसेनेचा वाघ, गुडघे टेकणार नाही ; EDच्या नोटिशीनंतर राऊतांनी सुनावलं

"माझी मान कापली तरी मी गुवाहाटीचा मार्ग स्विकारणार नाही.या..मला अटक करा! जय महाराष्ट्र!," असे टि्वट संजय राऊत यांनी केले आहे.
Sanjay Raut
Sanjay Rautsarkarnama

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत (sanjay raut) यांना ईडीनं (ED) समन्स बजावलं आहे. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ईडी, मोदी सरकारवर टीका केली. (sanjay raut news update)

राऊत म्हणाले, "माझ्यावर कुठलीही कारवाई करा, मला अटक करा, तुंरुगात टाका, पण मी गुवाहाटीला जाणार नाही, माझी मान कापली तरी मी गुडघे टेकणार नाही, मी शिवसेनेचा वाघ आहे, बाळासाहेब यांच्यासोबत मी काम केलं आहे. मी कुठही असलो तरी शेवटपर्यंत शिवसेनेसोबतच असेल," असे राऊत म्हणाले. "त्यांना दिल्लीवरून आदेश आला असेल कि मला अटक करावी तर ते मला घेऊन जाऊ शकतात," असे राऊत म्हणाले.

ईडीने उद्या राऊतांनी हजर राहण्याची नोटिस बजावली आहे, या बाबत राऊतांनी विचारला असता ते म्हणाले, "उद्या माझी अलिबागला सभा आहे, त्या सभेला मी जाणार आहे, ते मला अटक करु शकतात, मी पळून जाणार नाही " असे राऊत म्हणाले.

Sanjay Raut
सचिन आहिरांचा बंडखोरांना इशारा ; फ्लोअर टेस्ट आधी रोड टेस्ट द्यावी लागेल

सुजित पाटकर आणि संजय राऊत यांची मुलगी एका वाईन ट्रेडिंग फर्ममध्ये भागीदार आहेत. पाटकर यांच्या पत्नी आणि संजय राऊत यांच्या पत्नीनं अलिबागमध्ये भागीदारीमध्ये जमीन खरेदी केल्याचंही उघडकीस आलं आहे. त्यामुळेच संजय राऊत यांना ईडीनं समन्स बजावलं आहे.

"माझी मान कापली तरी मी गुवाहाटीचा मार्ग स्विकारणार नाही.या..मला अटक करा! जय महाराष्ट्र!," असे टि्वट संजय राऊत यांनी केले आहे. हे ट्विट त्यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना टॅग केले आहे. याचा अर्थ त्यांनी थेट फडणवीस यांना आव्हान दिल्याचे बोलण्यात येत आहे.राऊत हे शिवसेनेची बाजू भक्कमपणे मांडत असल्याने त्यांच्याविरोधात समन्स बजाविण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com