राऊतांनी टोचले दिपाली सय्यद यांचे कान ; त्यांना हा अधिकार कोणी दिला ?

Sanjay Raut |"दिपाली सय्यद हा प्रवक्त्या नाहीत, त्या पदाधिकारी आहेत, त्यामुळे अशा प्रकारची विधान काळजीपूर्वक करणं गरजेचं आहे,"
Sanjay Raut, Dipali Sayyed
Sanjay Raut, Dipali Sayyed sarkarnama

मुंबई : 'काळजीपूर्वक वक्तव्य करा,' असं सांगत शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांचे कान टोचले आहे. "शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) लवकरच एकमेकांना भेटणार असल्याबाबतचे टि्वट दीपाली सय्यद (Dipali Sayyed) यांनी आज केलं आहे. या टि्वटमुळे चर्चांना उधाण आलं आहे. त्यावर राऊत एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.

"प्रवक्ते नसताना दिपाली सय्यद यांना हा अधिकार कोणी दिला," असा सवाल राऊतांनी उपस्थित केला आहे. "दिपाली सय्यद हा प्रवक्त्या नाहीत, त्या पदाधिकारी आहेत, त्यामुळे अशा प्रकारची विधान काळजीपूर्वक करणं गरजेचं आहे," असे राऊत म्हणालं.

"शिवसेनेतून बाहेर पडलेले नेते आमच्यावर टीका करतात ही त्यांची मजबूरी आहे. ते स्वतः टीका करीत नाही, भाजपच्या मुखातून ते टीका करीत आहेत, असे राऊत म्हणाले. "शिवसेनेतील बंडखोर नेते आणि आम्ही इतके वर्ष एकत्र काम केल्याने पुन्हा एकत्र यावं असे का वाटणार नाही," अशी प्रतिक्रिया राऊतांनी दिली आहे.

Sanjay Raut, Dipali Sayyed
'वेट अ‍ॅन्ड वॉच' राऊताचं नवं टि्वट ; राजभवनातील शिंदे-फडणवीसांचा फोटो शेअर

"येत्या दोन दिवसात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे शिवसैनिकांच्या भावनांचा आदर करुन पहिल्यांदा चर्चा करायला एकत्र येणार हे समजल्यावर खूप बरं वाटलं. शिंदे साहेबांनी शिवसैनिकांची तळमळ समजली आणि उद्धव साहेबांनी कुटुंबप्रमुखांची भूमिका मोठ्या मनाने निभावली हे स्पष्ट झाले आहेत. या मध्यस्थीकरीता भाजप नेत्यांनी मदत केली याबाबत धन्यवाद, चर्चेच्या ठिकाणाची प्रतीक्षा असेल," असे सय्यद यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटलं आहे.या टि्वटसोबत त्यांनी आणखी एक टि्वट केलं आहे.

"लवकरच आदित्य ठाकरे मंत्रीमंडळात दिसावेत, शिवसेनेच्या 50 आमदारांनी मातोश्रीवर दिसावे, आदरणीय उद्धव साहेब व आदरणीय शिंदेसाहेब एक व्हावे, शिवसेना हा गट नसुन हिंदुत्वाचा गड आहे, त्यावरचा भगवा नेहमी डौलाने फडकत राहील, असं दिपाली सय्यद यांनी टि्वटमध्ये म्हटलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in