शिंदे गटाचा प्रकार म्हणजे कॅामेडी एक्सप्रेस सीजन- 2

Sanjay Raut | Shivsena : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे.
sanjay raut, eknath shinde Latest News
sanjay raut, eknath shinde Latest Newssarkarnama

Sanjay Raut : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची मुख्यनेतेपदी नियुक्ती करण्यात आली असून मुंबईत बंडखोरांच्या गटाकडून पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणीही बरखास्त करत नवीन कार्यकारणी जाहीर केल्याचा प्रकार म्हणजे कॅामेडी एक्सप्रेस सीजन 2, असा प्रकार आहे, अशा शब्दात शिवसेना (Shivsena) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर टीका केली आहे. त्यांनी आज दिल्ली येथे प्रसार माध्यमांशी संवाद साधला. (sanjay raut, eknath shinde Latest News)

sanjay raut, eknath shinde Latest News
ही तर शिंदे गटाची केविलवाणी धडपड; खासदार सांवतांचा निशाणा

राऊत म्हणाले, मु्ंबईत विधिमंडळात जो काही प्रकार झाला तो कॅामेडी एक्सप्रेस सीजन-1 होता. आज जो प्रकार झाला तो सीजन- 2 होता. यामुळे राज्यातील जनता हसत आहे. बंडखोर आमदारांवर आपात्रतेच्या कारवाई संदर्भातील निकाल येत्या 20 जुलैला न्यायालयासमोर लागेल. यामुळे मुख्यमंत्री आणि अन्य 15 आमदार मोठ्या चिंतेत आहेत. त्यामुळे असले प्रकार केले जात आहेत. शिवसेना ही मुळ पक्ष आहे. असल्या गटाला आमची कार्यकारणी बरखास्त करण्याचा अधिकारच नाही. ही बाळासाहेबांची शिवसेना असून तिचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आहेत. जिथे ठाकरे तीच शिवसेना असणार. त्यामुळे त्यांनी काही केल तरी त्यांच दुकान बंद होणार आहे, असा घणाघात राऊतांनी केला आहे.

sanjay raut, eknath shinde Latest News
एकनाथ शिंदेंची मोठी खेळी; ठाकरेंना धक्का देत सेनेची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी केली जाहीर

ते पुढे म्हणाले, आज त्यांच्या बैठकीला उपस्थित असलेल्या खासदारांची संख्या चुकीची सांगत त्यांच्याकडून भ्रम निर्माण केला जात आहे. गट वाचवण्यासाठी हे प्रयत्न आहेत. मुळात मुख्यमंत्रीच आपात्र असल्याने त्यांनी मुख्यमंत्री म्हणून घेतलेली शपथही बेकायदेशीर आहे. शिवसेना हा नोंदणीकृत पक्ष आहे. हा विषय शिवसेना किंवा महाराष्ट्रापुरता नाही तर देशाच्या सविधानाचा आहे.

अरूणाचल प्रदेशात अशीच स्थिती निर्माण झाली होती तेव्हा काय झाल होतं यांच उदाहरणही यावेळी राऊत आणि खासदार आरविंद सावतांनी दिले. आजून आम्ही त्यांना लय हलक्यात घेतलय त्यांना हळूहळू शिवसेना काय ते कळेल. उद्धव ठाकरे महाराष्ट्रात फिरल्यावर ते आमच्यापुढे टीकू शकणार नाहीत, असा इशाराही राऊतांनी दिला आहे.

sanjay raut, eknath shinde Latest News
‘मातोश्री’च्या त्या निर्णयामुळे आढळरावांनी २००४ प्रमाणे उभारला बंडाचा झेंडा!

दरम्यान, आज शिंदे गटाकडून जाहीर करण्यात आलेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये रामदास कदम आणि माजी खासदार आनंदराव आडसूळ यांची नेते पदी नियुक्ती करण्यात आली. आमदार दीपक केसरकर यांची मुख्य प्रवक्तेपदी तर उपनेतेपदी यशवंत जाधव, गुलाबराव पाटील, उदय सामंत, शरद पोंक्षे, तानाजी सावंत, विजय नहाटा, शिवाजीराव आढळराव पाटील यांची निवड केली करण्यात आली आहे. यानंतर राऊत यांनी लगेच आपल्यासोबत 8 ते 9 खासदार असल्याचे सांगत शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे. आता यावर शिंदे गटाकडून काय प्रतिक्रिया येते हे बघावे लागणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com