सोमय्यांना कोट्यवधींच्या देणग्या कोण देत आहेत ? ; हिसाब तो देना पडेगा !

" ब्लॅकमेलर.. blackmailer जेल जायेंगे.."अशा शब्दात राऊतांनी सोमय्यांवर हल्लाबोल केला आहे.
Sanjay Raut News, Kirit Somaiya News, sanjay raut criticize kirit somaiya
Sanjay Raut News, Kirit Somaiya News, sanjay raut criticize kirit somaiya sarkarnama

मुंबई : शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजप नेते किरीट सोमय्यांवर (Kirit Somaiya) आयएनएस विक्रांत घोटाळाप्रकरणी गंभीर आरोप केले आहेत. आज पुन्हा राऊतांनी टि्वट करीत सोमय्यांवर निशाणा साधला आहे. (Kirit Somaiya News)

सोमय्या यांच्या युवक प्रतिष्ठानच्या आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी करण्याची मागणी राऊतांनी केली आहे. किरीट सोमय्या अँड फॅमिलीला कोट्यावधी रुपयांच्या देणग्या कोण देत आहेत ? असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला आहे. " ब्लॅकमेलर.. blackmailer जेल जायेंगे.."अशा शब्दात राऊतांनी सोमय्यांवर हल्लाबोल केला आहे.

Sanjay Raut News, Kirit Somaiya News, sanjay raut criticize kirit somaiya
MNS : राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा स्थगित

"बात निकलेगी तो फिर दूर तलक जायेगी.!, किरीट सोमय्या अँड फॅमिली ला कोट्यावधी रुपयांच्या देणग्या कोण देत आहेत ? युवक प्रतिष्ठानच्या आर्थिक व्यवहारची चौकधी होईल!ब्लॅकमेलर.. blackmailer जेल जायेंगे..हीसाब तो देना पडेगा! " असं टि्वट राऊतांनी केलं आहे.

Sanjay Raut News, Kirit Somaiya News, sanjay raut criticize kirit somaiya
बीडीडी चाळीतल्या महिलेचा जितेंद्र आव्हाडांच्या घराबाहेर आत्महत्येचा प्रयत्न

भारतीय नौदलातून निवृत्त करण्यात आलेली विमानवाहू युद्धनौका “आयएनएस विक्रांत’चा ६० कोटी रूपयांना लिलाव करण्यात आला. आयएनएस विक्रांत राज्यातच राहावी, जहाज भंगारात न जाता त्याचे संग्रहालयात रुपांतर व्हावे यासाठी किरीट सोमय्यांनी पैसे जमा केले होते. मात्र हे पैसे राज्यपाल कार्यालयात जमाच झाले नसल्याचा आरोप संजय राऊतांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com