ही तर शिंदे गटाची केविलवाणी धडपड; खासदार सांवतांचा निशाणा

Arvind Sawant|Shivsena|Eknath Shinde : शिंदे गटाकडून पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.
Arvind Sawant Latest News
Arvind Sawant Latest News Sarkarnama

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मोठा धक्का दिला आहे. आज (ता.18 जुलै) शिंदे गटाच्या आमदारांची बैठक झाली. त्या बैठकीला शिवसेनेचे (shivsena) तब्बल १४ खासदार ऑनलाईन उपस्थित असल्याची माहिती मिळत आहे. यावेळी शिंदे यांची मुख्यनेतेपदी नियुक्तीही करण्यात आली आहे.

दरम्यान या बैठकीत शिंदे यांनी पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणीही जाहीर केली असून त्यामध्ये रामदास कदम (Ramdas Kadam) आणि माजी खासदार आनंदराव आडसूळ (Anandrao Aadsul) यांची नेते पदी नियुक्ती केली. आमदार दीपक केसरकर यांची मुख्य प्रवक्तेपदी निवड केली आहे. तर उपनेतेपदी यशवंत जाधव, गुलाबराव पाटील, उदय सामंत, शरद पोंक्षे, तानाजी सावंत, विजय नहाटा, शिवाजीराव आढळराव पाटील यांची निवड केली करण्यात आली आहे. यावर शिवसेना खासदार आरविंद सावंत यांनी आपली प्रतिक्रिया दिली असून शिंदे गटाकडून न्यायालयात बाजू मांडण्यासाठी ही सगळी केविलवाणी धडपड असल्याची टीका त्यांनी केली आहे. (Arvind Sawant Latest News)

Arvind Sawant Latest News
मातोश्रीचा ‘तो’ निर्णय आढळरावांना २००४ प्रमाणे बंड करायला लावणारा!

सावंत म्हणाले की, शिंदे गटाकडून ही सगळी केविलवाणी धडपड केली जात आहे. कोर्टाच्या समोर कसे जाणार आणि कुठल्या तोंडाने जाणार? यामुळे असला प्रकार केला जात आहे. आता त्यांचं दोन तृतीयांशच अस्तीत्वही आता पणाल लागल आहे. त्यांना आता विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही. कारण आम्ही सविधानाबद्दल बोलतोय. आणि त्या सविधानाची धज्जीया उडवण्याचे काम भाजपकडून केलं जात आहे. या परिस्थितीतही उद्धव ठाकरे हे उभे आहेत याचं मला कौतूक वाटत. कारण त्यांनी बरोबर हेरल आहे की हे कश्यासाठी चालले आहेत. ते सत्ता स्थापनेसाठी गेले नसून शिवसेनेचं खच्चीकरण करण्यासाठी गेले आहेत. हा भाजपचा अजेंडा आहे, अश्या शब्दात सावंतांनी भाजप आणि बंडखोरांवर टीका केली.

Arvind Sawant Latest News
शिवसेनेच्या खासदारांपुढे तीनच पर्याय; संसदेच्या पावसाळी अधिवेशनातच ठरणार रणनीती?

ज्या भाजपला बाळासाहेबांनी मोठ केलं सन्मानाने वागवलं आता तेच शिवसेच्या मुळावर घाव घालण्याच काम करत आहे. बाळासाहेब हे मोठ्या मनाचे होते. त्यांनी भाजपला तुम्ही देश सांभाळा आम्हा राज्य सांभाळतो म्हटले होते. मात्र, त्यांनी राज्यातल्या तंबूतही उंट घुसवला आहे. मित्र पक्षाची त्यांनी फसवणुक केली आहे. लोकसभेसाठी आकडे हवे असल्याने ते शिवसेनेसोबत येतात आणि विधानसभेत आमची आणि मित्र पक्षांची फसवणूक करतात. 2019 च्या निवडणुकीत 70 ते 80 जागा शिवसेनेच्या आल्या असत्या. मात्र भाजमुळे आल्या नाही, अशा शब्दात सांवत यांनी भाजपला सुनावले.

ते म्हणाले की, भाजप चाणाक्यनितीने चालत नसुन याला कपटनीती म्हणतात, मित्र पक्षांची भाजप कसा विश्वासघात करतो हे महादेव जानकरांना विचारा त्यांचे उमेदवार उभे केले जातात आणि त्यांना एबी फॅार्म हे भाजपकडून दिले जातात, असेही सावंत म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in