आता ही पुडी कोणी सोडली ? ; शिवसेनेचे खासदार संतप्त

या पुड्या भाजपच्या आयटी (IT)सेलच्या माध्यमातून सोडल्या जात आहेत.
Arvind Sawant
Arvind SawantSarkarnama

मुंबई : महाराष्ट्रात सत्तात्तर होऊन एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत. शिवसेनेला खिंडार पाडून शिंदे यांनी भाजपसोबत (BJP)सत्ता स्थापन केली आहे. शिवसेना आमदारांच्या बंडाळीनंतर आता शिवसेनेचे खासदारही शिंदे गटात सामील होणार असल्याची चर्चा दोन दिवसापासून सुरु आहे. यावर शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant)यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

अरविंद सावंत म्हणाले, "शिंदे गटाने केलेल्या पक्षविरोधी कारवायामुळे त्यांच्यावर कारवाई होत आहे. त्यामुळेच शिंदेची गटनेतेपदावरुन हकालपट्टी करण्यात आली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा हा आदेश आहे," "एकीकडे ते शिवसेनेचे आहेत असं म्हणतात, हाताला शिव बंधनं बांधलेले आहे, असे म्हणतात, मग ते पक्ष्याचे बंधन का पाळत नाही,"असा सवाल सावंतांनी उपस्थित केला.

Arvind Sawant
शरद पवारांनी आरोप फेटाळला ; म्हणाले, 'याचा महाराष्ट्राच्या राजकारणाशी संबंध नाही'

"काल (शुक्रवारी) शिवसेनेच्या खासदारांची मातोश्रीवर बैठक झाली. या बैठकीला सर्व खासदार उपस्थित होते. खासदार संजय राऊत हे ईडीच्या चौकशीसाठी गेले होते. त्यामुळे ते आले नाहीत. शिवसेनेचे १८ पैकी १४ खासदार शिंदे गटाकडे जाणार ही कोणीतरी पुडी सोडली आहे. या पुड्या भाजपच्या आयटी (IT)सेलच्या माध्यमातून सोडल्या जात आहेत," असे सावंत म्हणाले.

शिंदे सरकारची बहुमत चाचणी आणि विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक यासाठी ३ आणि ४ जुलै रोजी विशेष अधिवेशन होणार आहे.

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी (Assembly Speaker Election) महाविकास आघाडीकडून राजन साळवी (Rajan Salvi) यांनी आज अर्ज भरला. भाजपकडून (bjp) कुलाब्याचे तरुण आमदार राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com