राज्यसभा निवडणूक : शिवसेनेत रणकंदन; आमदारांचा मुक्काम पुन्हा ट्रायडंटमध्ये

BJP | Shivsena | Rajyasabha : यापूर्वी भाजप आमदारांचा मुक्कामही याच हॉटेलमध्ये असल्याने शिवसेना आमदारांचा मुक्काम हलवला होता
Uddhav Thackeray | Eknath Shinde | Milind Narvekar
Uddhav Thackeray | Eknath Shinde | Milind Narvekar Sarkarnama

मुंबई : राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (Shivsena) आमदारांना हॉटेल रिट्रीटमध्ये हलविण्यावरून 'वर्षा'वर रामायण घडले आणि या आमदारांना आता पुन्हा 'ट्रायडंट'मध्ये हलविण्यात येणार आहे. मडमधून बैठकांसाठी चकरा माराव्या लागणार असल्यावरून आमदारांनी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यापुढे नाराजी मांडली, आणि सध्या नाराजी ओढावून घेणे परवडणारे नसल्याने शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी ठाकरेंशी चर्चा करून ट्रायडंटमध्ये ६५ खोल्या बुक केल्या आहेत. त्यामुळे पुढच्या तीन दिवसांचा आमदारांचा मुक्काम या ठिकाणी असेल. मात्र, हॉटेल बदल्यावरून शिवसेना नेत्यांत रणकंदन झाल्याचे सांगण्यात येत आहे. (Shivsena | Rajya Sabha Election Latest News)

मुख्यमंत्री ठाकरेंसोबतची वर्षावरील बैठक आटोपल्यानंतर बसमधून निघालेले आमदार रात्री पावणेअकारा वाजता रिट्रीटमध्ये पोचले. त्यानंतर जेवणासाठीही उशीर झाला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मंगळवारी सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि ठाकरेसोबतच्या बैठकीसाठी आमदारांना दुपारी ट्रायडंटमध्ये आणण्याचे नियोजन होते. या प्रवासात किमान तीन-साडेतीन जात असल्याने आमदारांत नाराजीचा सूर होता.

त्यावरून वर्षावर झालेल्या बैठकीत काही आमदारांनी आपली भूमिका मांडली आणि काही मिनिटांतच आमदारांना पुन्हा 'ट्रायडंट'मध्ये आणण्याचा निर्णय ठाकरे यांनी घेतला. मात्र, त्यानंतर मंगळवारी दुपारी बारा वाजल्यापासून शिवसेनेने ट्रायडंट बुक करण्यात आले असून, त्यामुळे आमदार मंडळीही खूष होणार आहे.

Uddhav Thackeray | Eknath Shinde | Milind Narvekar
महाजन लागले कामाला; हितेंद्र ठाकुरांकडून शब्द घेवूनच 'बविआ'चे कार्यालय सोडले

याआधी ट्रायडंटमध्ये सोय केली असतानाही त्यात बदल करून आमदारांना मड रिट्रीटमध्ये हलविण्यात आले होते. मात्र, आता सोयीच्या ठिकाणी ठेवले जाणार असून, रिट्रीटमधून आमदार मंगळवारी दुपारी आपल्या बॅगा घेऊन ट्रायडंटमध्ये शिफ्ट होणार आहेत.

दरम्यान, काही नेत्यांनी आपापल्या पातळ्यांवर निर्णय घेत, आमदारांना रिट्रीटमध्ये हलविले होते. त्यारवरू काही जणांत मतभेदही झाले होते. दरम्यान, पवार आणि ठाकरे हे महाविकास आघाडीच्या आमदारांशी चर्चा करणार आहेत. त्यासाठी विशेष बैठक होणार आहे. त्यामुळे या बैठकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. (Shivsena | Rajya Sabha Election Latest News)

Uddhav Thackeray | Eknath Shinde | Milind Narvekar
भाजपच्या ‘एनडीए’ मध्ये आमची घुसमट होतेय : माजी मुख्यमंत्र्यांनी टाकला बॉम्ब

राज्यसभा निवडणुकीत सहाव्या जागेवर उमेदवार देऊन तो निवडून आणण्यासाठी शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी ताकद लावली आहे. गेल्या दोन दिवसांत ठाकरे आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अपक्ष आमदारांशी चर्चा केली. त्यानंतर स्वपक्षाच्या आमदारांना दोन दिवसआधीच बोलावून वर्षावर बोलावून ठाकरे यांनी चर्चा केली. त्यानंतर नव्या राजकीय हालचालींना वेग आला आहे..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com