संतोष बांगर यांनी आव्हान दिले पण उद्धव ठाकरेंनीही ते मोडण्याचं प्लॅनिंग केलंय...

Santosh Bangar | Shivsena | Uddhav Thackeray : आज हिंगोलीतील दोन्ही गटातील पदाधिकारी आणि शिवसैनिक मुंबईत दाखल झाले होते.
Uddhav Thackeray News, Mla Santosh Bangar News, Hingoli Latest Marathi News
Uddhav Thackeray News, Mla Santosh Bangar News, Hingoli Latest Marathi NewsSarkarnama

मुंबई : हिंगोलीचे बंडखोर आमदार संतोष बांगर यांनी आज (१२ जुलै) सह्याद्री अतिथी गृहावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या समर्थनार्थ शक्तिप्रदर्शन केलं. यावेळी शेकडो शिवसैनिक आणि पदाधिकारी उपस्थित होते. शिवसैनिकांनी एकनाथ शिंदे आणि संतोष बांगर यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी संतोष बांगर यांची हिंगोली शिवसेना जिल्हाध्यक्ष पदावरुन हकालपट्टी केल्यानंतर त्यांनी आज थेट मुंबईत येऊन हे शक्तिप्रदर्शन केलं.

त्याचवेळी उद्धव ठाकरे यांनीही आज शिवसेना भवनात हिंगोलीतील शिवसेना पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी ठाकरे यांच्यासमोर देखील शेकडो पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते. त्यांनीही ठाकरे यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली. तसेच आपण ठाकरे आणि शिवसेनेसोबतच असल्याचा विश्वासही या पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांना दिला. योगायोगाने एकाच दिवशी झालेल्या या शक्तिप्रदर्शनाच्या निमित्ताने आज हिंगोलीतील दोन्ही गटातील पदाधिकारी आणि शिवसैनिक मुंबईत दाखल झाले होते.

Uddhav Thackeray News, Mla Santosh Bangar News, Hingoli Latest Marathi News
माजी मुख्यमंत्री आणि माजी विरोधी पक्ष नेत्याची आमदारकी धोक्यात; अध्यक्षांकडे याचिका

मात्र या दोन्ही बाजूच्या शक्तिप्रदर्शनात उद्धव ठाकरेंचे पाडरे काहीसे जड दिसून आले. कारण हिंगोलीतील एकूण ५ तालुका प्रमुखांपैकी ४ तालुकाप्रमुख ठाकरेंसोबत होते. तर केवळ एक तालुकाप्रमुख शिंदेंसोबत होते. तसेच ५ उपजिल्हा प्रमुखांपैकी पाचही ठाकरेंसोबत शिवसेना भवनात होते. शिवाय १५ जिल्हा परिषद सदस्यांपैकी १४ जण ठाकरेंसोबत आणि १ शिंदे यांच्यासोबत होते.

ठाकरे यांना आज जवळपास ४०० पदाधिकारी भेटण्यासाठी आले होते. यात जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष गणाजी बेले, उपजिल्हा प्रमुख परमेश्वर मांडगे, संदेश देशमुख, हिंगोली तालुका प्रमुख भानुदास जाधव, जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब मगर, अंकुश आहेर, माजी जिल्हा परिषद सदस्य माऊली झटे, तसेच प्रल्हाद राखोंडे, नंदकिशोर खिल्लारे यांच्यासह पदाधिकारी आदीचा समावेश होता.

Uddhav Thackeray News, Mla Santosh Bangar News, Hingoli Latest Marathi News
मुफ्तींना फोन लावायचा असेल पण चुकून मातोश्रीवर लागला असावा : राऊतांचा राजनाथ यांना टोला

तर बांगर यांच्यासमवेत औंढा तालुका शिवसेनाप्रमुख साहेबराव देशमुख व नगर पंचायतचे ९ नगरसेवक होते. औंढा येथील नगरपंचायतीचे अध्यक्ष कपील खंदारे, नगरसेवक दिलीप राठोड, प्रदिप कनकुटे, विष्णु पवार, मनोज देशमुख, अनिल देव, राहुल दंतवार, अनिल देशमुख यांचा समावेश होता. शिवाय इतर पदाधिकारीही बांगर यांच्यासमवेत होते. शक्तिप्रदर्शन करतेवेळी बांगर यांचा हा सगळा खटाटोप मंत्रिपदासाठी सुरु असल्याच्या चर्चा सुरु होत्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in