राज ठाकरेंना शिवसेनेनं सुनावलं ; स्वतःच्या मुलालाच राजकारणात पुढे आणलं, देशपांडेंना का नाही ?

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंसोबतचा राज ठाकरेंचा फोटो देशपांडेंनी शेअर केला आहे.
Manisha Kayande, Raj Thackeray, sandeep deshpande
Manisha Kayande, Raj Thackeray, sandeep deshpande sarkarnama

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) यांच्या मंत्रिमंडळात मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे चिरंजीव आणि मनसेचे युवा नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांना मंत्रिपद मिळणार, अशी चर्चा काही दिवासापासून माध्यमांमध्ये होती. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी यांनी या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. अमित ठाकरे हे नव्या सरकारमध्ये मंत्री होणार नाहीत, अशा मोठा खुलासा राज ठाकरे यांनी केला आहे. (shivsena latest news)

मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी आज सूचक टि्वट केले आहे. शिवसेनेला डिवचण्याची एकही संधी संदीप देशपांडे सोडत नाही, आजही त्यांनी टि्वट करुन शिवसेनेची खिल्ली उडवली आहे. "अब राजा वही बनेगा जो हकदार होगा," असे टि्वट देशपांडे यांनी केले आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंसोबतचा राज ठाकरेंचा फोटो देशपांडेंनी शेअर केला आहे.

संदीप देशपांडेंच्या टि्वटला शिवसेनेच्या नेत्या मनीषा कायंदे (Manisha Kayande) यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. त्या माध्यमांशी बोलत होत्या. "राज ठाकरे यांनी स्वतःच्या मुलालाच का राजकारणात पुढे आणले, संदीप देशपांडे यांना का पुढे आणले नाही," असा सवाल मनीषा कायंदे यांनी उपस्थित केला आहे."शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच पुढे नेत आहेत," अशा शब्दातअप्रत्यक्षपणे राज ठाकरेंना यांना सुनावलं आहे.

Manisha Kayande, Raj Thackeray, sandeep deshpande
मी लोटांगण कशाला घालू ? राऊतांच्या विधानांना काहीही अर्थ नाही ; भुमरेंनी सुनावलं

मनसेच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये समावेश असणार या चर्चेमुळे उत्साहाचे वातावरण आहे.अशा चर्चा सुरू असल्यातरी अमित ठाकरेंनी ऑफ द रेकॉर्ड गृहमंत्री पदाची मागणी केली होती. यामुळे भाजप आणि मनसेच्या युतीच्या चर्चा दबक्या आवाजात सुरू आहेत. अब राजा का बेटा राजा नही बनेगा राजा वही बनेगा जो हकदार होगा त्याचा मतितार्थ आहे. बाळासाहेबांचे विचार आता राज ठाकरे पुढे घेऊन जाणार आहेत, बाकी कुणीही नाही, असा दावाच देशपांडेंनी केला आहे.

सत्तारांनी कॉग्रेसकडून निवडणूक का लढली नाही?

अब्दुल सत्तार यांच्याबाबत कायंदे म्हणाल्या, "अब्दुल सत्तार यांना निवडणुक लढवायची होती मग ते ज्या काँग्रेसमध्ये होते तेथून का नाही लढले. शिवसेनेकडे एबी फॉर्म मागायला का आले? निवडणुका होत असतात, जय-पराजय होत असते. आम्ही लढाईसाठी तयार आहोत,"

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in