संभाजीराजेंना राष्ट्रवादी, काँग्रेस,भाजपची उमेदवारी चालले, पण शिवधनुष्य चाललं नाही !

छत्रपती शाहू महाराज यांनी जे केले ते योग्यच.
संभाजीराजेंना राष्ट्रवादी, काँग्रेस,भाजपची उमेदवारी चालले, पण शिवधनुष्य चाललं नाही !

डोंबिवली : राज्यसभेच्या उमेदवारीवरून राज्यातील राजकारण तापलं आहे. संभाजीराजे छत्रपती (sambhajiraje chhatrapati) यांनी या निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जबाबदार ठरले आहे. उमेदवारीबाबतचा ड्राफ्ट तयार झाला होता. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) दिलेला शब्द मोडला, असा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे. ही माघार नाही, माझा स्वाभिमान आहे, असंही संभाजीराजेंनी स्पष्ट केलं आहे. यावर शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (sambhajiraje chhatrapati news)

"छत्रपती शाहू महाराज यांनी जे केले ते योग्यच. छत्रपती संभाजीराजे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी चालली, भाजपच्या दर आठवड्याला होणाऱ्या बैठकीला ते हजेरी लावायचे मात्र शिवसेनेच शिवधनुष्य त्यांना चाललं नाही, हे आमचे दुर्दैव म्हणावे लागेल," अशी खंत खासदार विनायक राऊत (vinayak raut) यांनी कल्याण मध्ये व्यक्त केली.

संभाजीराजेंना राष्ट्रवादी, काँग्रेस,भाजपची उमेदवारी चालले, पण शिवधनुष्य चाललं नाही !
राज्यसभेसाठी काँग्रेसकडून 'या' नावांची चर्चा ; सोनिया गांधी घेणार अंतिम निर्णय

छत्रपती संभाजी राजे यांनी शिवसेनेवर आरोप केल्यानंतर शाहू महाराजांनी त्यांना खडे बोल सुनावले होते. त्यावर वडिलांचा आदर करतो मात्र सत्य तेच बोलतो असे ट्विट संभाजीराजे यांनी केले आहे यावर राऊत यांनी वरील खंत व्यक्त केली.

कल्याण पश्चिमेतील वायले नगर येथे शिवसंपर्क अभियानांतर्गत शिवसैनिकांशी संपर्क साधण्यासाठी शनिवारी शिवसेनेचे खासदार विनायक राऊत आले होते. यावेळी संभाजी राजें यांनी केलेल्या शिवसेनेवरील आरोपानंतर त्यांचे वडील छत्रपती शाहू महाराजांनी त्यांचा अपमान छत्रपती घराण्याचा अपमान कसा असा सवाल करत संभाजी राजे यांना खडेबोल सुनावले .तर याबाबत छत्रपती संभाजी राजे यांनी पत्रकार परिषदेत सत्य तेच बोललो , वडिलांचा मी आदर करतो ते जे बोलले त्यावर मी काही बोलू इच्छित नाही अस ट्विट केलं.

संभाजीराजेंना राष्ट्रवादी, काँग्रेस,भाजपची उमेदवारी चालले, पण शिवधनुष्य चाललं नाही !
सगळीकडे ढवळाढवळ करण्याचा अधिकार विश्व प्रवक्त्यांना कुणी दिला ? चंद्रकांतदादांचा सवाल

याबाबत शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांना विचारलं असता त्यांनी छत्रपती शाहू महाराजांचे आभार मानतो त्यांना वंदन करतो असे सांगताना अशा पद्धतीने मोठ्या विचारांचे शाहू महाराज आजही या महाराष्ट्रात आहेत, आम्हाला त्यांचे मार्गदर्शन लाभतयं हे आमचं भाग्य असल्याचे सांगितले. शाहू महाराजांनी जे वक्तव्य केले ते योग्यच असून छत्रपती संभाजीराजे यांना राज्यसभेची उमेदवारी देत असताना शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यसभेची उमेदवारी देतो मात्र शिवबंधन बांधा, जी जागा शिवसेनेची आहे. शिवसेनेच्या कोट्यातून जाणार असल्याने शिवसेनेचा खासदार जाणे आवश्यक आहे त्या अनुषंगाने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे किमान दोन महिने आधीच स्पष्ट निर्णय दिला होता. मात्र दुर्दैवाने संभाजीराजे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी चालली, भाजपची उमेदवारी चालले दर आठवड्याला होणाऱ्या बैठकीला हजेरी लावायचे मात्र शिवसेनेच्या शिवधनुष्य त्यांना चाललं नाही हे आमचे दुर्दैव म्हणावे लागेल.

राणे यांची बकवासगिरी आम्ही मोडीत काढली

खासदार विनायक राऊत यांनी नितेश राणे यांची लायकी काय नेमकी काय लायकी आहे त्याची समाजामध्ये,स्वतःचा पक्ष बुडीत काढला,राणे कुटुंबीयांनी स्वतःची कातडी वाचवण्यासाठी भाजपची लाचारी सुरू केली आहे. नितेश राणे यांची बकवास गिरी आम्ही आता मोडीत काढली आहे, अशा शब्दात खासदार राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केला.दरम्यान खासदार राऊत आज कल्याण मध्ये आयोजित मेळाव्यात मार्गदर्शन करण्यासाठी कल्याणात आले होते .

कातडी वाचवण्यासाठी भाजपची लाचारी

दिवा येथे नितेश राणे यांनी शिवसेना नेते राऊत यांच्यावर निशाणा साधत लोमत्याना किती महत्त्व द्यायचे. पूर्ण दिवस पवार साहेबांची आणि अन्य लोकांची लोमतेगिरी करून परत एकदा खासदार झाले आहेत ना, त्यांच्या कोटा नेमका कुठला शिवसेनेच्या कोट्यातील की राष्ट्रवादीच्या पहिले ते त्यांना विचारा ? अशी टीका केली होती. याबाबत बोलताना खासदार विनायक राऊत यांनी नितेश राणे यांची समाजामध्ये काय लायकी राहिली आहे. स्वतःचा पक्ष बुडीत काढला तो बरखास्त केला. केवळ स्वतःची कातडी वाचविण्यासाठी, ईडीच्या कारवाई पासून बचाव करण्यासाठी राणे कुटुंबियांने भाजपा पक्षाकडे लाचारी पत्करली आहे. त्या नितेश राणे यांची बकवासगिरी आता आम्ही मोडीत काढली आहे, असे खडेबोल सुनावले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in