'मातोश्री'वर येऊन जा, महाप्रसाद घेऊन जा ; राणा दाम्पत्याला युवासेनेचं आव्हान

राणा दाम्पत्य सगळ्यांना चकवा देत मातोश्रीपर्यंत पोहोचले आहेत. मुंबईत हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळू शकतो.
'मातोश्री'वर येऊन जा, महाप्रसाद घेऊन जा ; राणा दाम्पत्याला युवासेनेचं आव्हान
Varun Sardesaisarkarnama

मुंबई : सध्या राज्यामध्ये मशिदींवरील लाऊडस्पीकरबाबत वाद उफाळला आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 3 एप्रिलपर्यंत मशिदींवर लावलेले भोंगे उतरवण्याचा अल्टिमेटम दिला आहे. अपक्ष आमदार रवी राणा, खासदार नवनीत राणा (Navneet Rana) उद्या (शनिवारी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर (Matoshri)हनुमान चालीसाचे पठण करणार आहेत. त्यासाठी ते आज (ता. २२ एप्रिल) विदर्भ एक्स्प्रेसने मुंबईला जाणार होते. त्यांना रोखण्यासाठी शिवसेनेकडून (shivsena) नियोजन केले जात असताना अचानक राणा पती-पत्नी मुंबईत दाखल झाले आहेत.

राणा दाम्पत्याला रोखण्यासाठी शिववसैनिक, पोलिस सज्ज झाले आहे. त्यांचा शोध आता मुंबईत घेतला जात आहे. त्यांना शोधण्यासाठी शिवसैनिक रस्त्यावर उतरले आहेत. त्यांच्यावर युवासेनेचे नेते वरुण सरदेसाई यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. ते माध्यमांशी बोलत होते.

''राणा दाम्पत्यांना आमचं सांगणं आहे, मातोश्रीवर या आणि महाप्रसाद घेऊन जा, नुसत्या तारखा देऊ नका एकदा येऊन जा,'' अशा शब्दात युवासेनेचे नेते वरुण सरदेसाई (Varun Sardesai) यांनी इशारा दिला आहे. ''हे सर्व भाजप करीत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करायची आणि केंद्राची सुरक्षा घ्यायची असा प्रयत्न काही जण करीत आहेत,''

राणा दाम्पत्य सगळ्यांना चकवा देत मातोश्रीपर्यंत पोहोचले आहेत. मुंबईत हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळू शकतो. ही शक्यता लक्षात घेऊन मुंबई पोलिसांनी मातोश्रीबाहेरील बंदोबस्त वाढवला आहे.

Varun Sardesai
शिवसैनिक, पोलिसांच्या हातावर तुरी देऊन राणा दाम्पत्य मुंबईत दाखल

खासदार नवनीत राणा मातोश्रीबाहेर येऊन हनुमान चालीसा पठण करण्याचा निर्धार व्यक्त केल्यामुळे मुंबईतील राजकीय वातावरण तापायला लागले आहे. सध्या दोन्ही बाजुंकडून एकमेकांना आव्हान-प्रतिआव्हान दिले जात आहे.

नवनीत राणा यांनी आपण कोणत्याही परिस्थितीत मातोश्रीवर जाणार, आपल्याला कोणीही अडवू शकत नाही, असे म्हटले होते. त्यानंतर वांद्रे परिसरात शिवसैनिकांनी नवनीत राणा यांना आव्हान देणारे बॅनर्स लावले आहेत. नवनीत राणा यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी वांद्रे परिसरात पाऊल ठेऊनच दाखवावे. शिवसैनिक सज्ज आहेत, असे बॅनर्स शिवसैनिकांकडून लावण्यात आले आहेत.

आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा गनिमी काव्याने मुंबईत दाखल झाल्याचे समजते. आज (शुक्रवारी) ते संध्याकाळी अमरावतीमधून रेल्वेने निघणार होते. मात्र शिवसेनेने त्यांना विरोध दर्शविला होता. त्यांना रोखण्यासाठी शिवसैनिक सज्ज होते.पोलीस सुध्दा राणा दाम्पत्याला स्थानबद्ध करण्याच्या तयारीत होते. मात्र त्यापूर्वीच शिवसैनिक आणि पोलिसांच्या हातावर तुरी देऊन राणा दाम्पत्य पसार झाले.

Varun Sardesai
'मेंटल मिटकरी' बद्दल बोलणं म्हणजे आम्हाला लाजल्यासारखं होतं ; मनसेनं उडवली खिल्ली

राणा दाम्पत्य व शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यावर पोलिसांनी करडी नजर ठेवली आहे. आज या आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा यांना मुंबईत मातोश्रीवर जाण्यापूर्वीच अमरावतीत पोलिस रोखणार होते. राणा दांपत्यांच्या सर्व हालचालीवर काल रात्रीपासून अमरावती पोलिसांची नजर होती. नवनीत आणि रवी राणा हे आज रात्री ७ वाजता विदर्भ एक्स्प्रेसने मुंबईत जाणार होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.