सोमय्यांचा मुक्काम कुठे? राऊतांनी आधीच सांगून टाकलं

सत्र न्यायालयाने किरीट सोमय्या यांना दणका दिला असून, त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे.
Sanjay Raut,Kirit Somaiya
Sanjay Raut,Kirit Somaiyasarkarnama

मुंबई : आयएनएस विक्रांत युद्धनौका निधी गैरव्यवहारामध्ये गुन्हा दाखल झालेले भाजपचे (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit somaiya) यांना न्यायालयाने दणका दिला आहे. सत्र न्यायालयाने सोमय्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली असून, त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे. सोमय्यांच्या अडचणीत वाढ होताच शिवसेनेचे (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भविष्यवाणी केली आहे.

सोमय्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळताच संजय राऊत यांनी ट्विट केले आहे. त्यांना या ट्विटमध्ये माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि मंत्री नवाब मलिक यांचा संदर्भ दिला आहे. राऊतांनी थेट सोमय्यांचा मुक्काम कुठे असेल याचे भाकित वर्तवले आहे. त्यांनी म्हटले आहे की, बाप बेटे जेल जायेंगे.. अनिल देशमुख, नवाब मलिक के बाजूकेही कोठडी मे रहेंगे..आग लगाने वालो को कहाँ खबर, रुख हवाओं ने बदला तो खाक वो भी होंगे..

Sanjay Raut,Kirit Somaiya
सोमय्यांना न्यायालयाचा दणका! अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

माजी सैनिक बबन भोसले यांनी सोमय्या यांच्याविरोधात तक्रार केली आहे. फसवणूक आणि विश्वासघात कलमांन्वये तुर्भे पोलीस ठाण्यात सोमय्या पिता-पुत्रांविरोधात गुन्हा दाखल आहे. पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी बोलावले आहे. त्या प्रकरणी अटक होण्याच्या शक्यतेने सोमय्या आणि त्यांचे पुत्र नगरसेवक नील सोमय्या (Neil Somaiya) यांनी सत्र न्यायालयात जामिनासाठी धाव घेतली होती. न्यायालयाने सोमय्यांना दणका देत त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. नील सोमय्या यांच्या जामीन अर्जावर न्यायालय उद्या निर्णय सुनावणार आहे.

Sanjay Raut,Kirit Somaiya
वनवास भोगल्याशिवाय..! राज ठाकरे भेटीनंतर वसंत मोरेंची फेसबुक पोस्ट व्हायरल

विक्रांत युद्धनौका संवर्धनासाठी सोमय्या यांनी काही वर्षांपूर्वी निधी संकलन अभियान राबवले होते. त्यामध्ये नागरिकांकडून निधी घेण्यात आला होता. त्यात जमा झालेली सुमारे 58 कोटींची रक्कम अद्याप सरकारकडे जमा केली गेली नाही, असा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. आयएनएस विक्रांत वाचवण्यासाठी जमा झालेले 58 कोटी रुपये सोमय्यांनी हडप केल्याचा आरोप राऊत यांनी राज्यपाल कार्यालयातील पत्राचा हवाला देत केला होता. त्यानंतर माजी सैनिक भोसले यांनी सोमय्या यांच्याविरोधात तक्रार दिली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com