एनसीबीचे काम काय..अन् ती करतेय काय? तपासाबाबत संजय राऊतांचे प्रश्नचिन्ह

अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूवरुन सुरू असलेला गदारोळ अद्याप कायम आहे. या प्रकरणी रोज नवनवीन धक्कादायक बाबी समोर येत असल्याने यातील गुंतागुंत आणखी वाढत आहे.
shivsena leader sanjay raut questions ncb interrogation in sushants case
shivsena leader sanjay raut questions ncb interrogation in sushants case

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात ड्रग्जच्या अँगलचा तपास करणाऱ्या अमली पदार्थ विरोधी विभागाने (एनसीबी) सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती यांना अटक केली आहे. त्यांच्या चौकशीत अनेक नावे समोर आली आहेत. या प्रकरणी अभिनेत्री दीपिका पदुकोण, सारा अली खान, राकुल प्रीत सिंह आणि श्रद्धा कपूर यांच्यासह आणखी काही अभिनेत्रींना एनसीबीने समन्स बजावण्यात आले होते. एनसीबीने राकुलची आज चौकशी केली. आता शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी एनसीबीच्या कार्यपद्धतीबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. 

'एनसीबी'कडून रिया आणि तिचा भाऊ शौविक यांची चौकशी झाली होती. ड्रग्ज रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या बॉलीवूडमधील काही कलाकारांची नावे या दोघांनी उघड केली आहेत. बॉलीवूडमधील पार्ट्या आणि ड्रग्जची तस्करी यावरही या दोघांनी प्रकाश पाडला आहे. एनसीबीकडून काही कलाकारांना या प्रकरणी चौकशीसाठी या आठवड्यात बोलावण्यात आले आहे. 

रिया चक्रवर्तीच्या चौकशीत तिने बॉलीवूडमधील कलाकारांची नावे उघड केली आहेत. यात अभिनेत्री दीपिका पदुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर, राकुल प्रीत सिंग आणि फॅशन डिझायनर सिमॉन खंबाटा यांची नावे आहेत. त्यांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले आहे. याचबरोबर अनेक इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्या आणि इव्हेंट मॅनेजरही एनसीबीच्या रडारवर आले आहेत. बॉलीवूडमधील ड्रग्ज रॅकेटची पाळेमुळे खणून काढण्याच्या दिशेने एनसीबी पावले टाकत आहे. याचबरोबर दीपिकाची मॅनेजर करिष्मा प्रकाश आणि केडब्लूएएन टॅलेंट मॅनेजमेंट एजन्सीचे सीईओ ध्रुव चितगोपकर यांनाही चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. 

राकुल प्रीत सिंह आज चौकशीसाठी एनसीबीसमोर हजर झाली. आज तिची सुमारे चार तास चौकशी करण्यात आली. या चौकशीत तिने रियासोबत ड्रग्जसंदर्भात चॅट केल्याचे कबूल केले आहे. ड्रग्जविरोधी मोहिमांमध्ये सहभागी असणारी आणि तेलंगण राज्याची बँड अॅम्बेसिडर असेलल्या राकुले कोणतेही ड्रग्ज घेतल्याचा आज जोरदार इन्कार केला. याचबरोबर कोणत्याही ड्रग्ज वितरकाशी संबंध नसल्याचेही तिने सांगितले, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

राकुल आणि दीपिका पदुकोणची व्यवस्थापिका करिष्मा प्रकाश यांची आज चौकशी झाली आहे. दीपिका पदुकोण, सारा अली खान आणि श्रद्धा कपूर यांची उद्या चौकशी होईल. एनसीबीने या प्रकरणी 24 सप्टेंबरला फॅशन डिझायनर सिमॉन खंबाटा आणि सुशांतची माजी व्यवस्थापिका श्रुती मोदी यांची चौकशी केली होती. 

एनसीबीच्या या तपासाच्या मालिकेवर संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त केली आहे. राऊत म्हणाले की, एनसीबीचे काम हे ड्रग्ज तस्करी रोखण्याचे असते. परंतु, आता ती काय करत आहे तर दररोज एका व्यक्तीची चौकशी. कोणत्या क्षेत्रात व्यसन नसते? काहींना पैशाचे व्यसन असते तर काहींना इतर काही गोष्टींचे व्यसन असते. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com