'नारायण राणे आणि नितेश राणेंचा राजकीय इन्शुरन्स संपला'

शिवसेना खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
Vinayak Raut & Narayan Rane
Vinayak Raut & Narayan RaneSarkarnama

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) आणि आमदार नितेश राणे (Nitesh Rane) या पितापुत्रांचा राजकीय इन्शुरन्स संपला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) कृपेने मिळालेले मंत्रीपद राणेंनी जनतेसाठी वापरावे. अन्यथा हे मंत्रीपदही ते स्वाहा करतील, अशी टीका शिवसेना खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी राणे पितापुत्रावर केली आहे. त्यांनी आज (ता.18 मार्च) मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राणेंना लक्ष्य केले.

Vinayak Raut & Narayan Rane
बिबट्या सफारीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांच्यात होणार बैठक

गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीचे नेते आणि भाजपमध्ये चांगलाच वाद रंगला आहे. त्यात राणे कुटुंबीय आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये जोरदार शाब्दीक युद्ध सातत्याने सुरूच आहे. राऊत म्हणाले, नारायण राणेंना दीर्घायुष्य लाभो. मात्र, त्यांना मोदींच्या कृपेने मिळालेल्या मंत्रीपदाच उपयोग जनतेसाठी करावा अन्यथा हे मंत्रीपदही ते स्वाहा करतील, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

Vinayak Raut & Narayan Rane
'द कश्मीर फाईल्स' नंतर आता 'लखीमपूर फाईल्स'?

राऊत म्हणाले, महाविकास आघाडी सरकार भक्कम आहे. राज्यात सत्ता स्थापन करून महाविकास आघाडी सरकारला अडीच वर्षे पूर्ण झाली आहेत. आणखी अडीच वर्षही महाविकास आघाडीचे सरकार कायम राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

हेही वाचा : ठाकरे सरकारमधून राजू शेट्टी बाहेर पडणार? राऊत म्हणाले..

स्वाभीमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडण्याच्या मनस्थिती आहे. ठाकरे सरकारने सर्वच पातळीवर आमची निराशा केली असल्याची भावना स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. ठाकरे सरकारमध्ये राहायचयं की बाहेर पडाचयं याचा निर्णय ५ एप्रिल रोजी घेणार असल्याचे 'स्वाभीमानी'चे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले आहे.

या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले, ''राजू शेट्टी हे शेतकर्‍यांचे नेते आहेत, त्यांचेही काही प्रश्न असतात, त्यांनी दिल्लीत जंतरमंतर येथे जाऊन आंदोलन करावे, आम्ही देखील त्या आंदोलनात सहभागी होऊ, कारण शेतकऱ्यांच्या संदर्भात काही धोरणे ही केंद्र सरकारची असतात, त्यामुळे त्यांनी जर असे आंदोलन केले तर आम्ही देखील त्यांच्या पाठीशी राहू, राजू शेट्टी हे झुंजार नेते आहेत, लढवय्ये नेते आहेत, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ते प्रामाणिकपणे लढत असतात,'' राऊत पत्रकारांशी बोलत होते.

"महाविकास आघाडीने सर्वच पातळीवर निराशा केली आहे. महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडण्याबाबत कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र आहेत. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकारिणीच्या बैठकीत कठोर निर्णय घेण्याची वेळ आली आहे. येत्या 5 तारखेच्या बैठकीत कठोर निर्णय घेतला जाईल,मी आमदारकीच्या आशेवर बसलो नाही, नाही मिळाली तरी फरक पडत नाही. " असं माजी खासदार राजू शेट्टी यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

Vinayak Raut & Narayan Rane
अखेर ठरलं! करुणा शर्मा कोल्हापूरमधून राजकीय मैदानात मारणार उडी

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत विचारले असता राऊत म्हणाले, ''विधानसभा अध्यक्ष पदाचा निर्णय जटिल प्रश्न नाही, पण तरी जटिल करण्यात आला आहे, खरं म्हणजे हा विषय इतका जटिल होऊ नये, कारण तो घटनात्मक विषय आहे आणि घटनेनुसार च्या निवडणुका व्हायला पाहिजेत, महाराष्ट्र मंत्रिमंडळाने शिफारस केलेली आहे, खरं म्हणजे कायद्याने राज्यपालांना विचारू नये, त्यांना फक्त कळवायचे असते , पण आमच्यात ती सौजन्य आहे की आम्ही त्यांना विचारत आहोत,''

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com