ED Raids : मरेन पण शिवसेना सोडणार नाही, चौकशी सुरु असताना राऊतांचं टि्वट

दोन तासांपासून ईडीचे दहा अधिकारी त्यांची चौकशी करीत आहेत. त्यांची पत्नी वर्षा राऊत, भाऊ सुनील राऊत त्यांच्यासोबत आहेत.
MP Sanjay raut
MP Sanjay rautSarkarnama

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊतांच्या घरी आज सकाळीच ईडीचे (ED)पथक दाखल झाले आहेत. पत्राचाळ प्रकरणी (Patra Chawl case)संजय राऊत यांची चौकशी सुरू असल्याची माहिती आहे. ईडीकडून चौकशी असतानाच संजय राऊत यांनी टि्वट केले आहे. "आपण शिवसेना सोडणार नाही," असे टि्वट संजय राऊत (sanjay raut) यांनी केली आहे.

"महाराष्ट्र आणि शिवसेना लढत राहिल, मरेन पण शिवसेना सोडणार नाही शरण जाणार नाही, कोणत्याही घोटाळा मी केलेला नाही," असे दुसरं टि्वटही त्यांनी केले आहे. त्यांची दोन तासांपासून ईडीचे दहा अधिकारी त्यांची चौकशी करीत आहेत. त्यांची पत्नी वर्षा राऊत, भाऊ सुनील राऊत त्यांच्यासोबत आहेत.

sanjay raut  tweet
sanjay raut tweetsarkarnama

पत्राचाळ प्रकरणात 1039 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रविण राऊत यांची चौकशी होऊन त्यांना अटक करण्यात आली होती.

MP Sanjay raut
Sanjay Raut : पत्राचाळ प्रकरणी ED ची टीम थेट राऊतांच्या घरी पोहोचली

आज सकाळीच ईडीचे काही अधिकारी संजय राऊतांच्या घरी दाखल झाले. या अधिकाऱ्यांसह काही सुरक्षा रक्षकांनी राऊतांच्या घराबाहेर पहारा सुरू केला असून कुणालाही मध्ये येण्याास मज्जाव घालण्यात आला आहे.

ईडीने पाठवलेल्या समन्सला त्यांच्याकडून उत्तर मिळत नसल्याने आणि चौकशीत सहकार्य करत नसल्यानं आज EDची टीम थेट संजय राऊत यांच्या घरी पोहोचली आहे. शिवसैनिकांची राऊतांच्या बंगल्यासमोर गर्दी केली आहे. त्यांच्या समर्थनार्थ कार्यकर्ते जोरजोर घोषणा देत आहेत.

ईडीकडून राऊतांना काही दिवसांपूर्वी राऊत यांना चौकशीसाठी नोटीस बजावली होती. मात्र, संसदेचे अधिवेशन असल्याचे सांगून राऊत ईडीच्या चौकशीला सामोरे गेले नव्हते. तसेच त्यांनी ईडीकडून चौकशीसाठी मुदतवाढ मागवून घेतली होती ईडीच्या अधिकाऱ्यांकडून कागदपत्र तपासण्याचे काम सुरू आहे.

काय आहे प्रकरण?

  • प्रवीण राऊत यांच्यावर पत्राचाळमध्ये राहणाऱ्या नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. आशिष कन्स्ट्रक्शनला पत्राचाळमधील तीन हजार फ्लॅट बांधकाम करून 672 फ्लॅट भाडेकरूला द्यायचे होते.

  • मुंबईमधील गोरेगाव येथील पत्राचाळीत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाचा भूखंड आहे.

  • पत्राचाळ परिसरातील 672 कुटुंबीयांचा पुनर्विकास करण्यासाठी 2008 मध्ये मे. गुरू-आशीष कन्स्ट्रक्शन्सची रहिवाशांनी नियुक्ती केली. मात्र त्यांनी या जागेचा काही भाग खासगी बिल्डरांना विकला.

  • उर्वरित फ्लॅट म्हाडा आणि विकासक यांच्यात वाटून घ्यायचे होते. मात्र 2010 मध्ये प्रवीण राऊत यांनी गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचे काही शेअर एचडीआयएलला विकले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com