बैल कितीही आडमूठ असला तरी शेतकरी आपले शेत नांगरतोच; संजय राऊतांचा मोदींना टोला

शेतकरी आंदोलनात (Farmers Agitaion) मृत्युमुखी पडलेल्या 700 शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची माफी मागावी.
बैल कितीही आडमूठ असला तरी शेतकरी आपले शेत नांगरतोच; संजय राऊतांचा मोदींना टोला
Sanjay Raut Sarkarnama

मुंबई : काल (ता.19 नोव्हेंबर) पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) कृषी कायदे (Farm Laws) मागे घेण्याची घोषणा केली. यांनतर आंदोलक शेतकऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत करत आनंद व्यक्त केला आहे. याबरोबरच विरोधी पक्षातील नेत्यांकडून सुद्धा केंद्राने घेतलेल्या या निर्णयाचे स्वागत होत आहे. तरी, पंतप्रधान मोदी आणि भाजपवर काही राजकीय नेते मंडळीकडून टीका केली जात आहे. शिवसेना (Shivsena) नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ट्वीट करत पंतप्रधान मोदींना जोरदार टोला लगावला आहे.

Sanjay Raut
मोदी सरकारची कोंडी; केंद्रीय मंत्र्यांवर कारवाईची भाजप खासदारांचीच मागणी

संजय राऊत आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले की, 'बैल कितीही आठमूठा असला तरी, शेतकरी आपले शेत नांगरतोच. जय जवान, जय किसान' असे ट्विट राऊतांनी केले आहे. त्यासोबतच राऊत यांनी आधीच्या ट्विटमध्ये शेतकरी आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या 700 शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची माफी मागावी. शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदत करावी व तसेच, लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसाचारासह शेतकऱ्यांवरील सर्व गुन्हे मागे घेण्याची मागणी त्यांनी केली आहे.

Sanjay Raut
मोदींनी कायदे मागे घेतले अन् वद्रा म्हणाले, हा शेतकऱ्यांसह माझ्या पत्नीचा विजय!

याबरोबरच माध्यमांशी बोलताना राऊत यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले, गेल्या सात वर्षात पहिल्यांदाच पंतप्रधानांनी देशातील जनतेचा आवाज ऐकला आहे. पहिल्यांदा त्यांनी मन की बात ऐकली आहे. दिल्लीत अनेक शेतकऱ्यांचा मृत्यूही झाला आहे. एका वर्षापूर्वीच जर सरकारने ऐकले असते तर, अनेकांचा जीव वाचला असता, असे मत त्यानी व्यक्त केेले.

गेल्या दीड वर्षापासून देशातील शेतकरी व विशेष करून पंजाब, हरियाणाचे ह्या शेतकरी तीन कृषी काळे कायद्या विरोधात संघर्ष करत आंदोलन करत आहेत. सरकारची भूमिका आधीपासूनच आठमुठेपणाची होती. पंतप्रधान मोंदीनी शेतकऱ्यांच्या विरोधात जाऊन हे कायदे लागू केले होते. शेतकऱ्यांचे आंदोलन मोडून काढण्यासाठी अनेक प्रयत्न झाले. त्यांच्यावर लाठीचार्ज झाला, त्यांच्या अंगावर गाड्या घालून चिरडले, गुंड पाठवले, जालियनवाला बागेत जसा हिंसाचार झाला, तसा हिंसाचार शेतकऱ्यांवर करण्यात आला. पण शेतकरी हटला नाही, शेतकऱ्यांनी लढून हे स्वातंत्र्य मिळवले आहे, भिकेतुन नाही तर, यासाठी ७०० शेतकऱ्यांनी बलिदानही दिले आहे, असे राऊतांनी म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in