राज्यात "एक दुजे के लिए" हा नवीन सिनेमा सुरु; बंडखोरांनी राजकीय आत्महत्या केलीयं!

sanjay raut | बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेच्या नावाचा गैरवापर करू नका.
Sanjay Raut
Sanjay RautSarkarnama

मुंबई :"शिंदे सरकारचं (Eknath Shinde) बेकायदेशीर आहे. इतके दिवस होऊन सुद्धा मंत्रिमंडळ शपथविधी घेऊ शकत नाही, एक मुख्यमंत्री एक उपमुख्यमंत्री 'एक दुजे के लिए',राजकारणात 'एक दुजे के लिए' हा नवीन सिनेमा सुरु आहे. या चित्रपटाचा शेवट काय झाला हे आपल्याला माहित आहे," अशा शब्दात शिवसेनेचे खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी शिंदे सरकारवर टीकास्त्र सोडलं. ते आज माध्यमांशी बोलत होते.

संजय राऊत म्हणाले, "एक दुजे के लिए या चित्रपटाची कथा जरा समजून घ्या. त्यामुळे महाराराष्ट्रात एक दुजे के लिए हा जो सिनेमा पडद्यावर सुरु आहे… त्याचा राजकीय अंतही त्याच प्रकारे होईल, या बंडखोरांनी राजकीय आत्महत्या केली आहे,"

शिवसेनेच्या नावावर माधुकरी मागून जगू नका

"शिवसेना सोडून गेलेल्यांनी स्वतंत्र पक्ष स्थापन करावा, शिवसेनेच्या नावावर माधुकरी मागून जगू नका, शिवसेना ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचीच आहे. बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेच्या नावाचा गैरवापर करू नका," असेही राऊत म्हणाले.

Sanjay Raut
डिसलेंनी शाळेचा पासवर्ड वापरून काढला पगार ; चौकशी समितीकडून नियमभंगाचा ठपका

इतिहास बदलण्याची ताकद शिंदे गटात नाही

"ज्यांनी ज्यांनी शिवसेना सोडली ते राजकारणातून अनेक वर्षे हद्दपार झाले, त्यातील काही मोजके लोकं नंतर तरले पण बहुसंख्य आमदार- खासदार पराभूत झाल्याचं इतिहास सांगतो आणि इतिहास बदलण्याची ताकद शिंदे गटात नाही, अशा शब्दात राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लोबोल केला आहे.

Sanjay Raut
नाराजी टाळण्यासाठी पहिल्या टप्यात १० मंत्र्यांना शपथ ; मंत्रीमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला

शिवसेनेच्या पंखाखाली का जगतायं..

माजी मंत्री विजय शिवतारे यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे, यावर राऊत म्हणाले, "बेईमान शेवटपर्यंत सांगतो मी बेईमान नाही, आपल्या बेईमानीचे कारणं देत असतो. शिवसेना शिवसेना का करता, बाळासाहेब ठाकरेंची खरी शिवसेना आहे आणि भविष्यात राहिलं… त्या शिवसेनेच्या पंखाखाली का जगताय, नका जगू… तुम्हाला स्वाभिमान असेल… स्वाभिमानासाठी सगळे बाहेर पडलात मग तुम्ही शिवसेनेशिवाय तुमचे स्वतंत्र स्थान निर्माण करा, आणि जनतेला दाखवा,"

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in