अनिल परबांचा राज यांना टोला... आंदोलन करताय ना? दोन दिवस आत जायची तयारी ठेवा

मनसेला आव्हान करणारा मी कोण आहे?
अनिल परबांचा राज यांना टोला... आंदोलन करताय ना? दोन दिवस आत जायची तयारी ठेवा
Raj Thackeray , Anil Parab Latest NewsSarkarnama

मुंबई : राज्य सरकारला माझं एकच सांगणं आहे. आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. सत्ता येत-जात असते. कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही. उद्धव ठाकरे, तुम्हीही नाही, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री उद्धव दिला आहे. यावर शिवसेनेकडून प्रतिक्रिया यायला सुरूवात झाली आहे.

सत्तेचा गैरउपयोग कुणी करत नाही. कायदा जर कुणी मोडला असेल तर त्यांच्यावर कारवाई होती. आम्ही विरोधीपक्षात होतो तेव्हा अशी कारवाई होत होती.पोलिस कारवाई करतात त्यांना पकडून नेतात. ज्याला आंदोलन करायचे असते त्यांच्यावर कारवाई होत असते. हा सत्तेचा गैरवापर नाही. बाळासाहेब (Balasahe Thackeray) आम्हाला नेहमी सांगायचे आंदोलनाला जातात ना मग दोन दिवस आतमध्ये रहायची तयारी ठेवा, अशा शब्दात शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना टोला लगावला आहे. (Raj Thackeray , Anil Parab Latest Marathi News)

Raj Thackeray , Anil Parab Latest News
Aditya Thackeray : जगात जर्मनी नाही आता परभणी, अशी ओळख निर्माण करायची आहे ...

परब म्हणाले, आम्ही देखील आंदोलन केली. आमच्या घरी देखील असे पोलीस यायचे. पोलिस करत असलेली कारवाई ही शिवसेनेचे सरकार आहे म्हणून करत नाहीत. हा सत्तेचा गैरवापर नाही. ते पोलिसांचे काम आहे. त्यांनी कसे काम करावे हे पोलिस ठरवतात आणि त्यांचे काम करतात. मनसेला आव्हान करणारा मी कोण आहे? बाळासाहेब आम्हाला नेहमी सांगायचे आंदोलनाला जातात ना मग दोन दिवस आतमध्ये रहायची तयारी ठेवा. आम्ही नेहमी म्हणतो की, सत्ता ही कधीच कायम नसते. सत्तेचा ताम्रपट कुणीच घेऊन आलेला नसतो. तो जनतेचा अधिकार असून जनता ठरवत असते, अशा शब्दात परबांनी राज यांना डिवचले आहे.

राज्यात हनुमान चालिसा विरुद्ध मशिदींवरील भोंगे असे वातावरण तापले असतानाच राज ठाकरे यांनी आपला आयोध्या दौरा 5 जूनला ठरवला आहे. तर त्यापाठोपाठ लगेच १० जून रोजी शिवसेना नेते आणि मंत्री आदित्य ठाकरे (Aditya hackeray) हे देखील अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. याबाबत परब म्हणाले की, प्रत्येकाला आयोध्येला जाण्याचा अधिकार आहे. राज ठाकरेंना जर वाटतं असेल तर त्यांनी जावे, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

Raj Thackeray , Anil Parab Latest News
सत्तेचा ताम्रपट कोणी घेऊन आलेला नाही, उद्धव ठाकरे तुम्हीही नाही : राज यांचा खणखणीत इशारा

दरम्यान, राज यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र ट्वीट करत थेट इशाराच दिला आहे. राज्य सरकारला माझं एकच सांगणं आहे. आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. सत्ता येत-जात असते. कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही. उद्धव ठाकरे, तुम्हीही नाही, असे म्हणत राज यांनी एक पत्र ट्विट केले आहे.

या पत्रात राज म्हणतात की, मशिदीवरील भोंगे उतरवण्यासाठी मी आवाहन केल्यानंतर महाराष्ट्र सरकार बेभान होऊन अंगात आल्यासारखं वागत आहे. न्यायालयाने दिलेल्या निर्णयांची अंमलबजावणी व्हावी यासाठी मनसे कार्यकर्त्यांनी ४ मे रोजी भोंगे उतरवा आंदोलन सुरू करण्यापूर्वीच त्यांची धरपकड सुरू करण्यात आली. २८ हजार मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी प्रतिबंधात्मक नोटिसा बजावल्या. हजारोंना तडीपार केलं. अनेकांना तुरुंगात डांबलं. कशासाठी? ध्वनिप्रदूषण करणारे, लोकांना त्रास देणारे मशिदींवरचे अनधिकृत भोंगे उतरवले जाऊ नयेत यासाठी!”

गेला आठवडाभर महाराष्ट्र सैनिकांची दडपणूक करण्यासाठी राज्य सरकार ज्या पद्धतीने पोलीस बळाचा वापर करत आहे, ते पाहाता मला प्रश्न पडलाय की मशिदींमध्ये ठेवलेली शस्त्रास्त्रे आणि अतिरेकी शोधून काढण्यासाठी अशी धरपकड मोहीम राज्य सरकारने किंवा पोलिसांनी कधी राबवली होती का? संदीप देशपांडे आणि इतर कार्यकर्त्यांना पोलीस असे शोधत आहेत, जणू ते पाकिस्तानातून आलेले अतिरेकी किंवा निजामाच्या हैद्राबाद संस्थानातले रझाकार आहेत”, असं राज ठाकरेंनी या पत्रात म्हटलं आहे. तसेच "मनसे कार्यकर्त्यांविरोधात ही अत्याचारी, दमनकारी कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना कुणी दिलेत, हे समस्त मराठीजन, तमाम हिंदूजन उघड्या डोळ्यांनी बघत आहेत", असे राज ठाकरेंनी आपल्या पत्रात म्हटल आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.