‘राज’कारण तापलं अन् नार्वेकरांच्या हट्टापायी महत्वाची बैठक सोडून आदित्य ठाकरे दक्षिणेत

राज ठाकरे अन् भाजपची जवळीक वाढल्यानं वातावरण तापलं
Aditya Thackeray and Milind Narvekar
Aditya Thackeray and Milind Narvekar Sarkarnama

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे खासदारांसह अन्य नेत्यांच्या बैठकांवर बैठका घेत असतानाच राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकरांनी (Milind Narvekar) दोन दिवसांसाठी दक्षिणेत हलविले. तिकडे व्यंकटेश्वराच्या दर्शनापासून तिरुमला तिरुपती देवस्थानच्या कार्यक्रमांना आदित्य ठाकरेंना नेत नार्वेकरांनी विश्वस्त सहकाऱ्यांनी छाप पाडली. पण नार्वेकरांच्या हट्टापायी आदित्य ठाकरेंना शिवसेना खासदारांच्या बैठकीला दांडी मारावी लागल्याची चर्चा अधिकच रंगली आहे.

राज्यात नव्या राजकीय घडामोडी घडत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पक्षप्रमुख म्हणून मैदानात उतरले आहेत. विरोधी भारतीय जनता पक्षाला अंगावर घेतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नव्या अजेंड्याला त्याच भाषेत उत्तर देण्याची तयारी मुख्यमंत्री ठाकरेंनी केली आहे. त्याचाच भाग म्हणून प्रवक्त्यांना विरोधकांवर तुटून पडण्याच्या आदेशापासून खासदारांची बैठक घेऊन मुख्यमंत्री ठाकरे हे रणनीती आखत आहेत. त्यामुळे खासदारांच्या बैठकीकडे साऱ्यांचे लक्ष लागले असतानाच आदित्य ठाकरे हे बैठकीला नसल्याची चर्चा झाली.

Aditya Thackeray and Milind Narvekar
राज ठाकरेंचं पुण्यात शाही स्वागत! शंभर पुरोहितांचं मंत्रपठण अन् फुलांचा वर्षाव

खासदारांची बैठक सुरू होण्याआधी आदित्य ठाकरेंसह मिलिंद नार्वेकर, सूरज चव्हाण आणि राहुल कनाल हे खासगी विमानाने तिरुपतीला पोचले. दर्शन आटोपल्यानंतर त्यांनी विश्वस्तांसोबत चर्चा केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी तिरुमला तिरुपती देवस्थानचे अध्यक्ष सुब्बा रेडी यांची आदित्य ठाकरे आणि नार्वेकरांनी भेट घेतली. देवस्थानला नवी मुंबईत दिलेल्या जागेसह प्रत्यक्ष कामाबाबत त्यांच्याच चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर आदित्य मुंबईकडे रवाना झाले. याचवेळी देवस्थानच्या महत्त्वाच्या बैठका असल्याने नार्वेकरांनी दक्षिणेतील आपला मुक्काम वाढविला आहे.

Aditya Thackeray and Milind Narvekar
राज ठाकरेंचं पुण्यात जंगी स्वागत पण वसंत मोरे कुठेच दिसेनात!

केंद्र सरकार आणि शिवसेना खासदारांमधील संघर्ष वाढत चालला आहे. निधीपासून अन्य कामे होत नसल्याची शिवसेना खासदारांची तक्रार आहे. त्या ऐकून घेत, त्यावर मार्ग काढण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्वतः पुढाकार घेऊन त्यांची बैठक घेतली. भाजपपुढे नमण्यापेक्षा त्यांच्याविरोधात दंड थोपटण्याचा शिवसेना नेतृत्त्वाचा इरादा आहे. त्यामुळे मुख्यमंत्री ठाकरे आणि खासदार यांच्यातील बैठक महत्त्वाची मानली जात होती. या बैठकीला शिवसेना नेत्यांसह आदित्य ठाकरे यांचीही उपस्थिती अपेक्षित असल्याचे बोलले जात होते. मात्र, नार्वेकरांच्या हट्टापुढे आदित्य यांनी खासदारांची बैठक सोडून दक्षिण दौर केल्याचे समजते. तिरुमला तिरुपती देवस्थानच्या विश्वस्तपदाची जबाबदारी आल्यापासून म्हणजे, गेल्या आठ महिन्यांपासून नार्वेकर हे देवस्थानाच्या कामात सक्रिय आहेत. मुख्यमंत्री आणि देवस्थानच्या पदाधिकाऱ्यांत संवाद ठेवून, शक्य तेवढी कामे करण्यासाठी नार्वेकरांनी पुढाकार घेतला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com