आशिष शेलारांनी शिवसेनेला आव्हान देताच किशोरी पेडणेकरांनी दिलं उत्तर

भाजपच्या पोलखोल मोहिमेवरून आता राजकीय वातावरण तापू लागले आहे.
Kishori Pednekar
Kishori Pednekar Sarkarnama

मुंबई : मुंबई महापालिकेतील (BMC) शिवसेनेचा (Shivsena) भ्रष्टाचार उघड करण्यासाठी मुंबई भाजपने (BJP) पोलखोल मोहीम सुरू केली आहे. या मोहीमेतील रथाची मोडतोड करण्यात आली होती. यामागील आरोपींना पकडावे, यासाठी भाजपने आज मोेर्चा काढला. या मोर्चात भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी शिवसेनेला थेट आव्हान दिले आहे. यावर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी उत्तर दिले आहे.

पेडणेकर म्हणाल्या की, काहीही झालं तरी शिवसेनेची नाव घ्यायची सवय भाजपला आहे. पोलीस त्यांचा तपास करीत असून, ते चुकीच्या गोष्टीला थारा देणार नाहीत. हल्लेखोरांना पकडण्यास मुंबई पोलीस सक्षम आहेत. भाजपने आरोप करायचे असेल ते करावेत. मात्र, हे त्यांचं शिवसेनेला बदनाम करण्याचं षडयंत्र आहे. पोलखोल करायलाही नियमांच पालन करावं लागतं. कायद्याचं पालनं न करता मुंबईतील वातावरण अस्थिर केलं जात आहे. भाजपचे लोक महागाई आणि पेट्रोल, डिझेल दरवाढीवर बोलत नाहीत. केवळ मुंबई महापालिका डोळ्यासमोर ठेवून ती मिळवण्यासाठी भाजप वाटेल त्या पातळीला जात आहे.

Kishori Pednekar
नामर्दासारखं वागू नका, हिंमत असेल तर समोर या! आशिष शेलारांचं शिवसेनेला खुलं आव्हान

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांच्या नेतृत्वाखाली चेेंबूरमध्ये अतिरिक्त पोलीस आयुक्तांच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या वेळी आशिष शेलार म्हणाले की, तुम्ही 5 वर्षांत मुंबईकरांची फसवणूक केली असून, त्याचा हिशेब घ्यावा. गेल्या 25 वर्षांत आणि विशेषत: मागच्या 5 वर्षांत तुम्ही मुंबईकरांच्या खिशातून घेतलेल्या पैशाचा अपव्यय केला. दगडफेक करणाऱ्यांना एकचा सांगतो की तारीख अन् वेळ तुम्ही ठरवा आणि दोघं मिळून दगडफेकीचं अभियान करू. नामर्दासारखं वागू नका. पोलिसांना या नामर्दांवर योग्य कारवाई करावी. आम्हाला मुंबई पोलिसांचं कर्तृत्व बघायचं आहे.

Kishori Pednekar
उच्च न्यायालयाचं संरक्षण मिळताच नील सोमय्या प्रकटले अन् म्हणाले, मी बाहेर गेलो होतो!

या दगडफेकीचं उत्तर आम्ही तसंच दिलं तर ठाकरे सरकार पुढील परिस्थितीला जबाबदार असेल. भाजपचं पोलखोल आणि शिवसेनेचा डब्बागोल अशी अवस्था आहे. भाजपच्या रथाची तोडफोड करणाऱ्यांना पोलिसांनी अटक करावी. आम्ही कुणाचंही नाव घेत नाही पण हा प्रकार करणारी संघटना पळपुटी आहे. पोलिसांनी या कटामागील सूत्रधार शोधून काढावा. पोलिसांनी आरोपींनी पकडल्यानंतर पोलीस त्यांना शिक्षा देतील पण त्यांना मुबंईतून हद्दपार करावं, असेही शेलार यांनी सांगितलं

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com