डोळे काढेन.. म्हणता एवढी हिंमत आहे का तुमच्यात?; पेडणेकरांचं राणेंना आव्हान

Narayan Rane : यांच्या बुद्धीची कुवत दिसतेय, अशा शब्दात पेडणेकरांनी राणेंना सुवावले.
Narayan Rane & Kishori Pednekar Latest News
Narayan Rane & Kishori Pednekar Latest NewsSarkarnama

पुणे : शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या आधीच शिंदे गट आणि शिवसेनेमध्ये शाब्दिक युद्ध रंगायला सुरूवात झाली असून काल मुंबईतील गोरेगाव येथे पार पडलेल्या गट प्रमुखांच्या मेळावात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिंदे गटावर आणि भाजपवर जोरदार निशाणा साधला. ठाकरेंची ही टीका भाजपच्या चांगलीत जिव्हारी लागली आहे. यावर भाजपकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी नेहमीप्रमाने ठाकरेंवर जोरदार टीका केली.

दरम्यान त्यांच्या या टीकेवर शिवसेना नेत्या आणि मुंबई पालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनीही राणेंना प्रत्युत्तर देत तुम्ही दादागिरी करताय का?डोळे काढेन..एवढी हिंमत आहे का तुमच्यात?, असे सावाल उपस्थित करत आव्हान दिले आहे. (Narayan Rane & Kishori Pednekar Latest News)

Narayan Rane & Kishori Pednekar Latest News
उद्धव ठाकरे जगातील 'ढ' माणूस...राणेंची टीका

राणे यांनी काल मुंबईतील गोरेगाव येथे पार पडलेल्या गट प्रमुखांच्या मेळावात उद्धव ठाकरे यांनी शिंदे गट आणि भाजपवर केलेल्या टीकेवर क्रमाने प्रत्युत्तर दिले आणि त्यांच्यावर टीका केली. त्यांच्या या टीकेवर पेडणेकरांनी त्यांना सुनावले आहे.

पेडणेकर म्हणाल्या, तुम्ही दादागिरी करताय का? डोळे काढेन म्हणता एवढी हिंमत आहे का तुमच्यात? उपमुख्यमंत्री हा काय तमाशा चाललाय? असा सवाल देवेंद्र फडणवीसांना केला. तसेच राणेंबद्दर बोलतांना त्या म्हणाल्या की, हे तुमच्या आईच्या दुधाचे संस्कार दाखवत आहेत. यांचे मनसुबे पूर्ण नाही झाले. प्रत्येक पक्षाचे उंकिरडे यांना फुंकावे लागतात. भानगडी बाहेर येवू लागल्यानंतर भाजपात गेले. पक्षप्रमुखांना घेरण्यासाठी सर्व घोडदौड करतायत. यांच्या बुद्धीची कुवत दिसतेय. तुमचे किती बंगले आहेत. तुमची कुठली बापजादयाची इस्टेट होती. गटमेळावा झाल्यानंतर यांची पायाखालची वाळू सरकली आहे. यांनी सुपारी घेतली आहे का?, अशा शब्दात पेडणेकरांनी राणेंचा समाचार घेतला. तसेच, मुख्यमंत्री शिंदेंनाही त्यांनी चांगलेच सुनावले. ते नाव सेनाप्रमुखांचे घेवून भाजपची स्क्रिप्ट चालवतात, असा टोमणाही त्यांनी शिंदेंना लगावला.

Narayan Rane & Kishori Pednekar Latest News
शिवसेनेला रोज संजय राऊत यांची आठवण... तोडीस तोड उत्तर देणाऱ्या नेत्याची वाणवा

दरम्यान, राणे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, मला भाजपात प्रवेश देऊ नये यासाठी उद्धव ठाकरेंनी शहांना कालपर्यंत फोन करत होते. त्याच शहांवर तुम्ही गिधाडं वगैरे टीका करता. चांगले बोलता येत नाही काय? बाप पळविणाऱ्या औलादीचे भाष्य करताय, बापाची ध्येय धोरणं न ठेवणारा हा माणूस आहे. बाळासाहेबांची एकनाथ शिंदे आणि आमदार आठवण काढतात, त्याला चोरी कसे काय म्हणू शकता. साहेब असे नव्हते, ते मोठ्यांचा आदर करायचे. हे चार खासदार, दहा आमदार निवडून आणू शकत नाही. आता संजय राऊतांची सोबत करायला त्यांना जावे लागणार. खोक्यांची चौकशी होणार असून यांच्या मागे ईडी लागणार, अशा शब्दात राणेंनी टीका करत ठाकरेंना इशाराही दिला आहे. आता त्यांच्या या टीकेला पेडणेकरांनी प्रत्युत्तर दिले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com