बबली मोठी झाली नाही, ती अजूनही अल्लडच!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे संपूर्ण देशात त्यांच्या विशेष कामासाठी अव्वल आले आहेत.
Navneet Rana & Kishori Pednekar Latest News
Navneet Rana & Kishori Pednekar Latest NewsSarkarnama

मुंबई : मागील तीन दिवसांपासून लीलावती रुग्णालयात उपचार घेत असलेल्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांना घरी सोडण्यात आलं आहे. रुग्णालयातून बाहेर येताच त्यांनी माध्यमांशी संवाद साधत थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना आव्हान दिलं. दम असेल तर महाराष्ट्रातील कुठल्याही मतदारसंघातून निवडणूक लढवावी, मी विरोधात लढेन, असं राणा यांनी म्हटलं आहे. यावर शिवसेना नेत्या आणि मुंबई महापालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी राणा यांना प्रत्युत्तर दिले. नवनीत राणा यांची मुख्यमंत्र्यांविरोधात लढण्याची लायकी नाही. बबली अजूनही नासमझ आहे. ठाकरे कुटुंबावर टीका केल्याशिवाय यांना प्रसिद्धी मिळूच शकत नाही, अशा शब्दात त्यांनी नवनीत राणांवर निशाणा साधला आहे. (MP Navneet Rana Latest marathi News)

Navneet Rana & Kishori Pednekar Latest News
मुख्यमंत्री ठाकरे फडणवीसांना पुन्हा आडवे; ताफ्यामुळे फडणवीस ताटकळत

पेडणेकर म्हणाल्या की, नवनीत यांच्या इशाऱ्याला हल्लाबोल नाही तर, खाज म्हणतात. ही जाणूनबुजून मुंबईत दंगल परिस्थिती निर्माण करायची ही खाज असून ज्या पद्धतीने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे संपूर्ण राज्यातच नाही तर देशात त्यांच्या विशेष कामासाठी अव्वल आल्याने खरी पोटदुखी होत आहे. एकाची बेंबीदुखी तर एकाची पोटदुखी असून एक भोंगा आहे तर दुसरा सोंगा. त्यांचा अॅप्लिफायर वेगळाच असल्याने ही खाज आहे. हा हल्लाबोल होऊ शकत नाही, अशा शब्दात पेडणेकरांनी नवनीत राणांवर जोरदार हल्लाबोल केला.

लोकशाहीने अधिकार दिलेत म्हणून काहीही नका बोलू नये. खासदाराप्रणाणे तुमचं वर्तन असू द्या. आम्हाला वाटलं होतं की बबली मोठी झाली पण, बबली मोठी झाली नाही. ती अजूनही अल्लडच आहे, असा खोचक टोला त्यांनी नवनीत राणांना लगावला.

Navneet Rana & Kishori Pednekar Latest News
"असली आ रहा है, नकली से सावधान!" अयोध्येत शिवसेनेची पोस्टरबाजी

रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर नवनीत राणांनी माध्यमांशी संवाद साधताना पुन्हा एकदा मुख्यमंत्री ठाकरे व शिवसेनेला शिंगावर घेतलं. त्या म्हणाल्या, मी अशी काय चूक केली, ज्याची शिक्षा मला दिली. हनुमान चालिसा पठण आणि रामाचे नाव घेणे गुन्हा असेल तर चौदा दिवस नाही चौदा वर्ष जेलमध्ये राहण्यास मी तयार आहे. चौदा दिवसांत ही महिला दबणार नाही. आमची लढाई देवाच्या नावासाठी आहे. पुढेही ही लढाई सुरू ठेवणार आहे. असे नवनीत राणा यांनी सांगितले.

ज्यापध्दतीने माझ्यावर कारवाई करण्यात आली, जनतेने ते पाहिले आहे. क्रुरपध्दतीने महाराष्ट्रातील एका महिलेवर, मुलीवर कारवाई केली आहे. सत्तेचा दुरूपयोग करण्यात आला. आता मी उद्धव ठाकरे यांना आव्हान देते, दम असेल तर त्यांनी लोकांमध्ये येऊन निवडणूक लढवून विजयी होऊन दाखवावे. महाराष्ट्रातील कोणताही मतदारसंघ त्यांनी निवडावा. मी त्यांच्या विरोधात उभी राहीन. महिलेच्या ताकदीसमोर आणि प्रामाणिकपणासमोर कोण निवडून येऊ शकते, हे दिसेल. पुर्वजांच्या नावाने मुख्यमंत्रिपद मिळाले आहे. आता जनतेसमोर येऊन लढावे. महाराष्ट्राची जनताच त्यांना उत्तर देईल, असं आव्हान राणा यांनी दिलं होते. त्यांच्या याच टीकेला पेडणेकरांनी प्रत्युत्तर दिले आहे.

दरम्यान. राजद्रोहाच्या गुन्ह्याखाली नवनीत राणा व त्यांचे पती आमदार रवी राणा बारा दिवस तुरुंगात होते. चार दिवसांपूर्वी दोघांनाही मुंबई सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला. जामीनावर सुटका झाल्यानंतर नवनीत राणा या थेट लीलावती रुग्णालयात दाखल झाल्या. तुरूंगात असताना त्यांच्या मानेचा त्रास बळावला होता. रुग्णालयात त्यांची तपासणी करून उपचार सुरू करण्यात आले. त्यानंतर रविवारी त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in