'ते' ट्विट देवेंद्रजींनी वाचलं तर त्यांनाही प्रश्न पडेल की माझ्या बायकोचं काय चाललंय!

तुम्ही वानरसेना म्हणत आहात, तर मग पुष्टी मिळाली आहे की राम आमच्या मनात आहे.
'ते' ट्विट देवेंद्रजींनी वाचलं तर त्यांनाही प्रश्न पडेल की माझ्या बायकोचं काय चाललंय!
Amruta Fadnavis, Kishori Pednekar Latest NewsSarkarnama

मुंबई : मुंबईतीत बीकेसी मैदानावर शनिवारी (ता.14 मे) झालेल्या शिवसेनेच्या (Shivsena) जाहीर सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजपवर (BJP) सडकून टीका केली. यावर लगेच काल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उत्तरसभा घेत मुख्यमंत्री ठाकरेंवर निशाणा साधला. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनीही ट्वीट करत मुख्यमंत्र्यावर अप्रत्यक्ष टीका केली. यावर शिवसेनेकडून प्रतिक्रिया आली असून मुंबई महापालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी ते ट्विट देवेंद्रजींनी वाचले तर त्यांनाही प्रश्न पडेल की माझ्या बायकोचे काय चालले आहे, अश्या शब्दात त्यांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे. (Amruta Fadnavis, Kishori Pednekar Latest News)

Amruta Fadnavis, Kishori Pednekar Latest News
किशोरी पेडणेकरांना मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यासमोर डावलले; इकबाल सिंह चहल ठरले हिरो

पेडणेकर यांनी देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. याचबरोबर त्यांनी अनेक विषयांवरही भाष्य केले. त्या म्हणाल्या, भगवा हा भाजपचा कधीच नव्हता. तुम्ही वानरसेना म्हणत आहात, तर मग पुष्टी मिळाली आहे की राम आमच्या मनात आहे. तुम्ही न्यायालय आहात का? यशवंत जाधव आले तर मग त्यांना मुख्यमंत्र्यांनी समर्थन दिले असे होत नाही. तुम्ही स्वःताच कबुल केले की, मुख्यमंत्री हलके फुलके आहेत. ते आहेतच हलके फुलके. पण तुमचे जसे राजकीय वजन तसे त्यांचेही राजकीय वजन आहे. तुम्ही मेट्रो मॅन असाल तर पापाचेही पण धनी व्हा आणि तसेच जी झाडं तोडली जे पशु-पक्षी मारले त्याचे धनी व्हा, असे पेडणेकरांनी फडणवीसांना सुनावले.

Amruta Fadnavis, Kishori Pednekar Latest News
Video: "शिवसेनेमुळे मुंबईची 'तुंबई' अशी ओळख", नितेश राणेंची शिवसेनेवर टीका

केतकी चितळेचा अभिमान असून ती कणखर असल्याचं वक्तव्य सदाभाऊ खोत यांनी केलं. यावर त्या म्हणाल्या की, केतकी चितळे ही अभिनेत्री आहे. तिच्या आजाराची सगळ्यांना माहिती आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या अनुभवाला राजकारणात अधिक महत्व आहे. सदाभाऊ खोत यांनी चितळेच्या वक्तव्याचे समर्थन केलं. त्यांना ही गोष्ट आम्ही सांगावी लागते हेच दुर्दैव आहे. यातून खोतांची राजकीय अपरिपक्वता दिसून येते, असा टोलाही त्यांनी खोतांना लगावला.

Amruta Fadnavis, Kishori Pednekar Latest News
बाबांनो, मी खूप अनुभवलंय...तोलून मापून बोला : अजितदादांचा कार्यकर्त्यांना सल्ला

दरम्यान, अमृता फडणवीसांच्या ट्विटबाबत बोलतांना त्या म्हणाल्या की, त्या ट्विटबद्दल मला काहीच समजलं नाही. त्याचा कोणताही संदर्भ लागत नाही. अमृता फडणवीसांना चर्चेत राहण्याची सवय लागली आहे. ते ट्विट देवेंद्रजींनी वाचले तर त्यांनाही प्रश्न पडेल की माझ्या बायकोचे काय चालले आहे. आम्ही त्यांच्या ट्विटकडे फारसे लक्ष देत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in