'मिंधे गट मुघलनीती वापरून शिवसेनेच्या शाखा ताब्यात घेण्यासाठी आटापिटा करतोय...'

Shivsena : ठाकरे गटाकडून शिंदे गटावर समाज माध्यमातून टीका...
Kedar Dighe, eknath shinde Latest News
Kedar Dighe, eknath shinde Latest Newssarkarnama

डोंबिवली : डोंबिवलमधील शिवसेनेची मध्यवर्ती शाखा शिंदे गटाने ताब्यात घेतल्याने ठाकरे गट व शिंदे गट यांच्यात ट्विटर वॉर सुरू झाल्याचे पहायला मिळत आहे. मिंधे गट मुघलनीती वापरून शिवसेनेच्या शाखा ताब्यात घेण्यासाठी आटापिटा करीत आहे, अशी घणाघाती टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे नेते केदार दिघे यांनी डोंबिवलीतील शिवसेना शहर शाखा ताब्यात घेण्यावरून केली केली.

यावर शिंदे गटाचे दीपेश म्हात्रे यांनी दिघेंच्या या टीकेवर पत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले की, बाळासाहेबांनी उभ्या केलेल्या जनसेवेच्या शाखा ताब्यात घेऊन त्या भाडेतत्त्वावर देऊन पैसा कमाविण्याचा कुटील डाव ठाकरे गटाने आखला होता. बाळासाहेबांची शिवसेनेच्या शिवसैनिकांनी तो हाणून पाडला आहे, असे ट्विट करत त्यांनी ठाकरे गटाला डिवचलं आहे. (Kedar Dighe, eknath shinde Latest News)

Kedar Dighe, eknath shinde Latest News
'मातोश्री'चा उंबरठा न ओलांडणारे आता शेतकऱ्याच्या बांधावर जाण्याचं नाटकं करताहेत...

शिवसेनेत दुफळी निर्माण झाल्यानंतर डोंबिवली मध्यवर्ती शिवसेना शाखेवर ताबा मिळविण्यासाठी शिंदे व ठाकरे गट प्रयत्न करीत होते. दोन महिन्यांपूर्वी शाखेत दोन्ही गटात तुफान राडेबाजी झाली होती, त्यानंतर दोन गटात ही शाखा विभागली गेली. अखेर दोन दिवसांपूर्वी शिंदे गटाने कायदेशीर रित्या शाखा आमच्या ताब्यात आली असल्याचा दावा करत शाखेचा ताबा स्वतःच्या हाती घेतला आहे. या पक्षाचे कार्यकर्ते जतीन पाटील यांच्य नावावर ही शाखा झाली आहे.

कागदोपत्री व्यवहार पूर्ण करून ही शाखा आम्ही विकत घेतली असल्याचे शिंदे गटाने पत्रकार परिषदेत स्पष्ट केले होते. तर शिवसेना (Shivsena) उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे डोंबिवली शहरप्रमुख विवेक खामकर यांनी यावर, आम्ही न्यायालयीन लढा लढणार. आत्ता जे काही सुरू आहे चुकीचे आहे, अशी प्रतिक्रिया दिली होती. शिंदे गटाच्या या पवित्र्यानंतर ठाकरे गटाकडून समाज माध्यमातून टीका केली जात आहे. या वादात आता केदार दिघे (Kedar Dighe) यांनी ही उडी घेतली आहे.

Kedar Dighe, eknath shinde Latest News
रवी राणांसोबत चर्चा करण्याची माझी इच्छा नाही : बच्चू कडू यांचा आक्रमक पवित्रा

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे नेते केदार दिघे यांनी डोंबिवलीतील शिवसेना शहर शाखा ताब्यात घेण्यावरून ट्विटरवरून शिंदे गटावर घणाघाती टीका केली आहे. मुघलांनी कपटाने शिवरायांचे गड ताब्यात घेतले. तसेच मिधें गट मुघल नीती वापरून शिवसेनेच्या शाखा ताब्यात घेण्यासाठी आटापिटा करीत आहे, असे ट्विट त्यांनी केले आहे.

दिघे यांच्या टीकेचा बाळासाहेबांची शिवसेनाचे युवा नेते दीपेश म्हात्रे यांनी समाचार घेतला आहे. बाळासाहेबांनी उभ्या केलेल्या जनसेवेच्या शाखा ताब्यात घेऊन त्या भाडेतत्त्वावर देऊन पैसा कमाविण्याचा कुटील डाव ठाकरे गटाने आखला होता. बाळासाहेबांची शिवसेनेच्या शिवसैनिकांनी तो हाणून पाडला, असे ट्विट दीपेश यांनी केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in