दावणीची म्हैस शिवसेनेच्या वाटेला सोडू नका : फडणवीसांवर टीका करताना दिपाली सय्यद यांची जीभ घसरली

Shivsena| Dipali Sayyad| Amruta Fadanvis| अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री थेट उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती.
अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री थेट उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती.
अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री थेट उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती.

मुंबई : महाराष्ट्रात (Maharashtra) सर्व जाती-धर्माचे लोक गुण्या-गोविंदाने राहतात. पण भोंग्याच्या मुद्द्यावरुन सुरु झालेल्या वादाचा त्रास हा सर्वात खालच्या स्तरातील लोकांना होणार आहे, अशी भावना शिवेसेनेच्या (Shivsena) पदाधिकारी दिपाली सय्यद (Dipali Sayyad) व्यक्त केली आहे. महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त न्यू कामगार संघटनेच्या वतीने कल्याणमध्ये आयोजित बाईक रॅलीच्या उद्घाटन कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरुन राज्य सरकारला ३ मे पर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. राज ठाकरेंच्या सभांवर सभांमुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. याच वेळी त्यांनी, राज ठाकरें यांची आज सभा आहे. त्यासाठी माझ्या शुभेच्छा आहेत. आजपर्यंत ते कुठेही विजयी झाले नाहीतर आतातरी विजयी व्हावेत", असं म्हणत त्यांनी राज ठाकरेंना टोला लगावला.

अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री थेट उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती.
भाजप आणि राष्ट्रवादीचं ठरलं होतं पण शिवसेनेला काहीच माहिती नव्हतं!

अशातच भोंग्यांच्या मुद्द्यावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री थेट उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. आता या टीकेवर दिपाली सय्यद यांनी पलटवार केला आहे. दिपाली सय्यद यांनी अमृता फडणवीस यांचं नाव न घेता अप्रत्यक्षपणे त्यांचा म्हैस म्हणून उल्लेख केला आहे.

अमृता फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेवरुन दिपाली सय्यद यांना प्रश्न विचारला असता त्या म्हणाल्या त्यांनी थेट फडणवीसांवर निशाणा साधत, "आता यावर काय बोलणार? मला फडणवीसांना एवढंच सांगायचं आहे की घरात-दावणीला बांधलेली म्हैस शिवसेनेच्या वाटेला सोडू नका. शिवसैनिक कोणालाही ऐकत नाहीत. नाहीतर तुमचं मी पुन्हा येईन, पुन्हा येईनचं स्वप्न हे स्वप्नच राहील", अशा शब्दांत टोला लगावला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com