शिवसेना म्हणते, कंगनावरील वैद्यकीय उपचारासाठी आम्ही डॉक्टर देऊ

अभिनेत्री कंगना राणावत आणि नौदल अधिकारी मदन शर्मा प्रकरणावरुन शिवसेना आणि भाजप असा सामना रंगला आहे. आता दोन्ही पक्षांतील नेत्यांमध्ये यावरुन आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरू आहेत.
shivsena leader anil parab says kangana needs treatment and shivsena will provide doctor
shivsena leader anil parab says kangana needs treatment and shivsena will provide doctor

मुंबई : अभिनेत्री कंगना राणावत हिने शिवसेनेविरोधात मोहीम उघडली आहे. तिच्या बाजूने भाजप नेते मैदानात उतरले आहेत. त्यातच नौदलाचे निवृत्त अधिकारी मदन शर्मा यांना शिवसैनिकांना मारहाण केल्याच्या प्रकरणावरुन भाजपकडून शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आता शिवसेना नेते आणि परिवहनमंत्री अनिल परब हे मैदानात उतरले असून, त्यांनी राज्यपालांना आव्हान देण्यासोबत कंगनालाही लक्ष्य केले आहे. 

परब म्हणाले की, बेकायदा बांधकाम पाडले म्हणून अभिनेत्री कंगना राणावतला राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी भेटतात. आता ज्या सामान्यांचे बेकायदा बांधकाम तुटले त्यांनाही  राज्यपालांनी भेट द्यावी. केंद्रातील सत्ताधारी भाजप त्यांच्या विरोधकात असलेली राज्यांची सरकार पाडण्याचा प्रयत्न करत आहे. 

कंगना ही अभिनेत्री आहे. तिला जे स्क्रिप्ट दिले आहे, त्यानुसार ती बोलतेय. तिला स्क्रिप्ट पर्सनॅलिटी असून, तिला वैद्यकीय उपचारांची आवश्‍यकता आहे. हवे तर तिच्यासाठी शिवसेना डॉक्‍टरांची कुमक देईल. मुंबईबद्दल वाईट बोलणार असाल तर आम्ही ऐकून घेणार नाही.ज्यांना मुंबई पाकव्याप्त काश्‍मीरप्रमाणे वाटते त्यांनी आपले बस्तान उचलावे, असे परब म्हणाले. 

कंगनाचे बांधकाम तुटल्यावर एवढा पोटशूळ का उठत आहे? तुमचे 105 आमदार असूनही मुख्यमंत्री होता आले नाही. या नैराश्‍यातून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस बिहारमध्ये महाराष्ट्राची बदनामी करत आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला. 

माजी नौदल अधिकाऱ्याला शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या मारहाणीचे समर्थनही परब यांनी केले. ते म्हणाले की, आमच्या दैवतावर बोलल्यास त्याची प्रतिक्रिया उमटणे साहजिक आहे. आम्ही सत्तेत आहोत म्हणून बोलणार नाही असे होणार नाही. आम्हाला दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी असे शिकवले नाही. संयम दोन्ही बाजूंकडून पाळला  जायला हवा. नौदल अधिकारी आहे म्हणून संयम सोडायचा अधिकार नाही. मर्यादा दोन्हीकडून पाळल्या पाहिजेत. त्या नौदल अधिकाऱ्यांनी जास्त काळ मर्चंट नेव्हीमध्ये काम केले होते. 

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी 'ठाकरे ब्रँड'चा उल्लेख करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना साद घातली आहे. त्यावर बोलताना परब म्हणाले की, राज ठाकरे यांचे आडनाव ठाकरे असल्याने त्यांना साद घातली असावी. ठाकरे हा ब्रँड भक्कम आहे. त्याला कोणीही हलवू शकत नाही. शिवसेनेने अनेक वादळे झेलली आहेत. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com