शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि बाळासाहेबांचे विश्वासू सहकारी सुधीर जोशी यांचे निधन

Shivsena | Sudhir Joshi Died : ते माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे मावस भाऊ होते.
Sudhir Joshi
Sudhir Joshi Sarkarnama

मुंबई : शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि शिवसेनाप्रमुख (Shivsena) बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे अत्यंत जवळचे सहकारी सुधीर जोशी (Sudhir Joshi) यांचे आज निधन झाले. वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांना कोविड-१९ संसर्गाची बाधा झाली होती. त्यामुळे त्यांच्यावर मुंबईतील जसलोक रुग्णालयात उपचार सुरू होते. नुकतेच कोरोनाच्या आजारातून घरी परतले होते. मात्र त्यांची प्रकृती काही दिवसांपासून अत्यवस्थच होती. ते माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे मावस भाऊ होते.

सुधीर जोशी हे मुंबईचे दुसरे महापौर होते. तसेच १९९५ ते १९९९ या युती सरकारच्या काळात ते महसूलमंत्री आणि शिक्षण मंत्री म्हणून देखील होते. या काळात त्यांनी शेतकऱ्यांच्या ७/१२ साठी त्यांनी अत्यंत महत्वाचे कार्य केले. पुढे मात्र १९९९ मध्ये आजारपणामुळे सक्रिय राजकारणातून त्यांनी निवृत्ती घेतली. प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते फारसे सार्वजनिक जीवनातही दिसत नव्हते. अखेरीस आज त्यांची प्राणज्योत मालवली.

शिवसेनेत कार्यकर्त्यांचे मोहोळ लाभलेले आणि लोभस व्यक्तिमत्त्व म्हणून सुधीर जोशी यांना ओळखले जात होते. मुंबईचे तरुण व तडफदार महापौर म्हणून मान मिळवलेल्या सुधीर जोशी यांच्याकडे सुशिक्षित कार्यकर्त्यांची फौज असलेल्या स्थानीय लोकाधिकार समितीची धुरा बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्याकडे सोपविली, ती त्यांनी समर्थपणे सांभाळली. त्यामुळे बाळासाहेबांच्या सहकारी नेत्यांमधील एक विश्वासू सहकारी नेता म्हणून ते कायमच जवळचे राहिले.

सुधीर जोशी हे १९६८ साली प्रथम नगरसेवक झाले. मुंबई महानगरपालिका गटनेता, विरोधी पक्षनेता म्हणून त्यांनी जबाबदारी संभाळली. पुढे १९७३ मध्ये मुंबई महानगरपालिकेचे सर्वांत तरुण महापौर झाले. १९६८ पासून ते विधान परिषद सदस्य देखील होते. १९९२-९३ या दरम्यान ते विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते होते. त्या दरम्यान त्यांनी राज्यातील रखडलेल्या सिंचन प्रकल्पाची पाहणी करून त्यासंदर्भातील अहवाल निष्कर्ष पुस्तिकेद्वारे शासनाकडे सादर केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com