योगी व्हायला बायकोला सोडाव लागंत पण..? दिपाली सय्यद यांचा थेट सवाल

फडणवीसांना दिपाली सय्यद यांचा थेट सवाल
Amruta Fadnavis and Deepali Sayyad
Amruta Fadnavis and Deepali SayyadSarkarnama

मुंबई : महाराष्ट्रात भोंग्याच्या मुद्यावरुन वाद पेटला आहे. याचवेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्या सूचनेवरुन उत्तर प्रदेशातील अनेक धार्मिक स्थळांवरील भोंगे उतरवण्यात आले आहेत, नाहीतर त्यांचा आवाज कमी करण्यात आला आहे. यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना भोगी असं म्हणून डिवचलं होतं. याला आता शिवसेनेच्या नेत्या दिपाली सय्यद (Deepali Sayed) यांनी उत्तर दिलं आहे.

योगी आदित्यनाथ यांचं नाव घेऊन अप्रत्यक्षपणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता. याचाच आधार घेत अमृता फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंसह शिवसेनेला डिवचलं होतं. 'ऐ भोगी, कुछ तो सीख हमारे योगी से,' असे वादग्रस्त ट्विट त्यांनी केलं होतं. यावरून मोठा गदारोळ उडाला होता आणि शिवसेनेच्या अनेक नेत्यांनीही याला प्रत्युत्तर दिलं होते. आता या वादात दिपाली सय्यद यांनी उडी घेतली आहे. त्यांनी योगी-भोगी या टीकेचा समाचार घेतला आहे. योगी होण्यासाठी बायकोला सोडावं लागतं, फडणवीस बायकोला सोडणार का? असा थेट सवाल करीत सय्यद यांनी अमृता फडणवीसांना टोला लगावला आहे.

Amruta Fadnavis and Deepali Sayyad
राज ठाकरेंच्या दौऱ्यात कुठंच न दिसलेले वसंत मोरे अखेर प्रकटले अन् म्हणाले...

उत्तर प्रदेशात आतापर्यंत अनेक धार्मिक स्थळांवरील भोंगे काढण्यात आले आहेत. तसेच, धार्मिक स्थळांवरील भोंग्यांसाठी आवाजाची मर्यादा निश्चित करुन देण्यात आली आहे. याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टि्वट करीत योगी आदित्यनाथ यांचं कौतुक केलं होतं. राज ठाकरे यांनी याबाबतचे टि्वट केले आहे. त्यांनी म्हटलं होतं की, उत्तर प्रदेशातील धार्मिक स्थळांवरील, विशेषत: मशिदींवरील भोंगे उतरवल्याबद्दल योगी सरकारचे मन:पूर्वक अभिनंदन आणि आभार. आमच्याकडे महाराष्ट्रात 'योगी' कुणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे 'भोगी'! महाराष्ट्र सरकारला सदबुध्दी मिळो, हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना.

Amruta Fadnavis and Deepali Sayyad
राज ठाकरे पुण्यात अन् मनसेचे नेते वसंत मोरे इफ्तार पार्टीत!

राज ठाकरे यांच्या 1 मे रोजी औरंगाबाद येथे होणाऱ्या सभेकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही लवकरच जाहीर सभा होणार आहे. मंबईतील बीकेसीमध्ये उद्धव शिवसेनेची १४ मे रोजी सभा होणार असून, ८ जूनला औरंगाबादमध्ये उद्धव ठाकरेंची सभा होणार आहे. त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर सभेची घोषणा करण्यात आली आहे. मुंबईतील सोमय्या मैदानावर ही सभा होणार असून, या सभेला ‘बूस्टर डोस’ सभा असे नाव देण्यात आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com