Shiv sena : गद्दारी का झाली? आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

Aditya Thackeray| Shivsena | राजकारण इतक्या खालच्या पातळीवर जाईल असं मला कधीही वाटलं नव्हतं
Aditya Thackeray News, Shivsena Latest Marathi News
Aditya Thackeray News, Shivsena Latest Marathi News

मुंबई : आमदारांनी केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेना पुरती कोसळली आहे. अशात पक्षाला नवी उभारी देण्यासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी धनुष्यबाण हाती घेत पक्षबांधणीसाठी प्रयत्न सुरू केले आहे. यासाठी निष्ठा यात्रेच्या माध्यमातून आदित्य ठाकरे लोकांची आणि शिवसैनिकांची भेट घेत आहेत. या निष्ठा यात्रेदरम्यान काल त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी आमदारांनी गद्दारी का झाली, असा सवाल त्यांना विचारला.(Shivsena Latest Marathi News)

माध्यमांच्या या प्रश्नांना उत्तर देताना आदित्य ठाकरे म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारमध्ये सर्व सुरळीत सुरू असल्याच पाहून काही जणांना महाराष्ट्रासाठी पोटदुखी होती. महाराष्ट्राचं नाव उज्ज्वल होतंय, महाराष्ट्राची प्रगती होत असलेली पाहून काही लोकांना बघवलं नाही, त्यामुळे त्यांनी गद्दारी झाली.

Aditya Thackeray News, Shivsena Latest Marathi News
PMO च्या पसंतीस उतरलेले श्रीकर परदेशी आता फडणवीस यांच्या दिमतीला

निष्ठा यात्रेबाबत बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, “ आजही शिवसेनेला लोकांचं प्रेम आणि आशीर्वाद मिळत आहेत. सामान्य नागरिक आणि राजकीय नेतेमंडळी नाही माहीत आहे, शिवसेना पक्ष प्रमुख आणि कुटुंबप्रमुखांच्या पाठीत खंजीर खुपसला गेला. त्यामुळेच सगळीकडेच शिवसैनिकांचं प्रेम आणि आशीर्वाद मिळत आहे. जे अराजकीय लोक आहेत ते देखील महाराष्ट्रात सर्कसवर लक्ष ठेवून होते. आम्ही महाराष्ट्रात फिरत आहोत. ही प्रेम यात्रा आहे, निष्ठा यात्रा आहे. आम्ही लोकांना भेटत आहोत, पण कोणावरही आरोप करत नाही, की टीका करत नाही.

पण राजकारण इतक्या खालच्या पातळीवर जाईल असं मला कधीही वाटलं नव्हतं. त्यांना सर्वकाही देऊनही ते उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसून गेले, हे राजकारण तुम्हाला मान्य आहे का? मुळात देशात लोकशाही शिल्लक राहिली आहे का? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला.

तुमच्या भल्यासाठी, जिथे तुमचं चांगलं होत असेल तिथे नक्की जा, सुखी रहा तिथे.पण तुमच्या मनात आमच्याबद्दल जो राग आहे, तो आमच्या मनात तुमच्याबद्दल नाही. काही जण सात सात वर्ष सत्तेत राहिले त्यांचं त्यांना आता अपचन होत आहे, अशी टीका देखील आदित्य ठाकरे यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in