शिवसेना बॅकफूटवर : शिंदे गोटातील आमदारांच्या वाढत्या संख्येमुळे उद्धव ठाकरेंची माघार!

Shivsena | BJP | Eknath Shinde | Uddhav Thackeray : शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडण्यासाठी तयार
शिवसेना बॅकफूटवर : शिंदे गोटातील आमदारांच्या वाढत्या संख्येमुळे उद्धव ठाकरेंची माघार!
Shivsena leader Sanjay Raut meets chief minister Uddhav ThackeraySarkarnama

मुंबई : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गोटात वेळेनुसार संख्या वाढत आहे. शिंदे यांच्या गोटात आता शिवसेनेचे ३७ आणि अपक्ष ९ असे तब्बल ४६ आमदार झाले आहेत. शिंदे यांना पक्षांतर बंदीच्या कायद्यातून वाचण्यासाठी ३७ आमदारांची आवश्यकता होती, ती संख्या आता पूर्ण झाली आहे. त्यामुळे त्यांना वेगळा गटस्थापनेसाठी कायदेशीर कोणतीही अडचण नाही, हे लक्षात आल्याने राज्यात शिवसेना (Shivsena) बॅकफूटवर गेलेली पाहायला मिळत आहे. आज सकाळपासून शिवसेनेने आपली भूमिका बदलली आहे. (Shivsena |Eknath shinde Latest news)

कालपर्यंत शिवसेनेने बंडखोर आमदारांवर कारवाईचा बडगा उचलण्याचा इशारा दिला होता. 'माघारी या अन्यथा सदस्यत्व घालवून बसला' असा इशारा दिला होता. आम्ही लढणारे लोक, शेवटी सत्याचा विजय होईल, आम्ही शेवटपर्यंत लढू, बहूमत सिद्ध करु, असे म्हणतं होते. एकूणच शिवसेना नरमाईच्या भूमिकेमध्ये दिसून येत नव्हती.

मात्र आज शिवसेनेने बंडखोर आमदारांपुढे चर्चेचा प्रस्ताव ठेवला आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज सकाळी माध्यमांशी बोलताना शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडण्यासाठी तयार आहोत. फक्त आमदारांनी २४ तासात मुंबईत यावं अशी ऑफर दिली. त्यापाठोपाठ चर्चेतून मार्ग निघू शकतो. चर्चा होऊ शकते. घरचे दरवाजे उघडे आहेत. का उगाच वण वण भटकताय? गुलामी पत्करण्यापेक्षा स्वाभिमानाने निर्णय घेऊ, असे ट्विट करत बंडखोर आमदारांना पुन्हा एकदा चर्चेचे निमंत्रण देण्यात आलं आहे. मात्र यावर एकनाथ शिंदे आता चर्चेची वेळ निघून गेली असल्याचं सांगत राऊत यांचा प्रस्ताव धुडकावून लावला आहे.

शिवसेनेच्या या बदलेल्या भूमिकेनंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पोटात गोळा आला आहे. या दोन्ही पक्षांनी शेवटपर्यंत उद्धव ठाकरे यांची साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र विकास आघाडी हे महाराष्ट्राचा विकास आणि कल्याणासाठी स्थापन झालेले सरकार आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत आम्ही शेवट पर्यंत ठामपणे उभे आहोत, असे आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले आहे.

तर काँग्रेसनेही उद्धव ठाकरे यांना आपला पाठिंबा जाहिर केला आहे. महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदाबाबत जो निर्णय उद्धव ठाकरे घेतील त्याला काँग्रेसचा पाठिंबा असेल, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले आहे. मात्र त्याचवेळी राऊत यांनी भूमिका बदलल्याने काँग्रेस पुन्हा एकदा विचार करणार असल्याची माहिती काँग्रेसच्या गोटातून मिळत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in