आदित्य ठाकरेंची पसंत : कदम, अहिर यांना डावलले, सुनील शिंदेंना विधान परिषदेत संधी
Aditya and Uddhav Thackeray sarkarnama

आदित्य ठाकरेंची पसंत : कदम, अहिर यांना डावलले, सुनील शिंदेंना विधान परिषदेत संधी

सुनील शिंदे (Sunil Shinde) यांनी आदित्य ठाकरेंसाठी वरळी मतदारसंघ सोडला होता.

मुंबई : मुंबई स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदारसंघातून वरळीचे माजी आमदार सुनील शिंदे यांना शिवसेनेने उमेदवारी दिली आहे. शिवसेनेचे पुरेसे संख्याबळ असल्याने शिंदे यांचा विजय निश्चित मानला जात आहे.

पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी वरळीतून विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला तेव्हा नेत्याला वाट करून दिली होती. आज या त्यागाचे बक्षीस त्यांना मिळाले आहे. ते विधान परिषदेचे आमदार होतील. या मतदारसंघातील विधान परिषदेतील विद्यमान आमदार व माजी मंत्री रामदास कदम यांचा पत्ता त्यामुळे कट झाला आहे. दुसरीकडे दोन वर्षांपूर्वी राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेले सचिन अहिर यांनाही हात चोळत बसावे लागणार आहे. त्यांना या वेळी संधी मिळाली नाही.

Aditya and Uddhav Thackeray
ठाकरेंच्या स्मृतीस्थळाला वंदन करून रामदास कदमांचा इशारा, लवकरच गौप्यस्फोट होणार..

ठाकरे कुटुंबातील निवडणूक लढविणारा पहिला सदस्य म्हणून आदित्य यांनी 2019 ची विधानसभा निवडणूक लढविली. त्यावेळी शिंदे हे वरळीचे आमदार होते. शिवसेनेसाठी सुरक्षित जागा म्हणून वरळीची निवड करण्यात आली होती. त्या वेळी शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली होती. ती आता दूर झाली आहे. त्याच वेळी अहिर यांनीही राष्ट्रवादीला धक्का देत सेनेत प्रवेश केला होता. सरकार आल्यानंतर त्यांना कोठेतरी संधी मिळेल, याची आशा त्यांच्या समर्थकांना होती. मात्र प्रत्यक्षात त्यांना कोणतेही अधिकाराचे पद मिळाले नाही. त्यांना अजून संघटनेतच काम करावे लागणार आहे, असे या निर्णयावरून दिसते आहे.

Aditya and Uddhav Thackeray
नगर व सोलापूरची विधान परिषद निवडणूक यामुळे ढकलली पुढे...

कदम यांना या निर्णयाची पूर्वकल्पना असावी. कारण त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावर दोन दिवसांपूर्वी दर्शन घेतानाच सूचक वक्तव्य केले होते. आपण लवकरच गौप्यस्फोट करणार असल्याचे जाहीर करत त्यांनी आपण गप्प बसणार नसल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे आता तिकिट नाकारल्यानंतर ते काय भूमिका घेतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in