आम्ही स्वस्थ बसणार नाही ; शिवसेनेचा कर्नाटक सरकारला इशारा

 Eknath Shinde 

Eknath Shinde 

sarkarnama

पुणे : बंगळूर (राजधानी) येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या (chhatrapati shivaji maharaj) मूर्तीची विटंबना करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. बेळगाव, कोल्हापूर, मिरज, सांगली येथे या घटनेचा निषेध करण्यात आला. शिवसेनेचे नेते, बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांनी याबाबत संताप व्यक्त केला आहे.

एकनाथ शिंदे यांनी टि्वट करीत कर्नाटक सरकारला इशारा दिला आहे. आपल्या टि्वटमध्ये शिंदे म्हणतात, ''कर्नाटक राज्यातील बंगलोर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या गुंडांचा आम्ही तीव्र निषेध करतो. महाराष्ट्र एकीकरण समिती आणि सर्व शिवप्रेमींच्या मागे महाराष्ट्र सरकार ठामपणे उभे आहे. कर्नाटक सरकारने बेळगाववर हक्क सांगण्यासाठी तिथे अधिवेशनाचा घाट घातलाय त्याचाही तीव्र निषेध. बंगलोरमधल्या गुन्हेगाराला तातडीने अटक व्हावी आणि अनधिकृत लाल पिवळ्या ध्वजाचं स्तोम थांबवावं,''

''मराठी जनतेवरच्या अन्यायामुळे आपण यशस्वी होऊ असा कर्नाटकचा समज असेल तर त्यांनी तो मनातून काढून टाकावा. रस्त्यावरच्या आणि न्यायालयातल्या दोन्ही लढ्यांत विजय मिळेपर्यंत महाराष्ट्र स्वस्थ बसणार नाही,'' असा इशारा एकनाथ शिंदे यांनी दिला आहे.

काही समाजकंटकांनी बंगळूर शुक्रवारी (१७ डिसेंबर) शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना केल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. बंगळूर येथील सदाशिवनगरमध्ये हा प्रकार घडला. या घटनेमुळे महाराष्ट्रातून संताप व्यक्त केला जात आहे. कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती यांनी ही या घटनेवर संताप व्यक्त केला आहे. ''संपूर्ण देशाची अस्मिता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची बेंगळुरू येथे झालेली विटंबना निषेधार्ह आहे. बेंगळुरूची उन्नती शहाजीराजेंमुळेच झाली याची जाण ठेवली पाहिजे. केंद्र व कर्नाटक सरकारने याची गांभीर्याने दखल घेऊन दोषींवर तातडीने कठोर कारवाई करावी.'' अशी मागणीही त्यांनी केली आहे.

या घटनेनंतर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपल्या ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट करत या घटनेचा निषेध नोंदवला आहे. इतकेच नव्हे तर त्यांनी थेट केंद्रसरकारवर निशाणा साधला आहे. ''दोन दिवस आधी पंत प्रधान मोदी काशी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याचा जयजयकार करतात आणि भाजपचे राज्य असलेल्या कर्नाटकात छत्रपतींची अशी विटंबना होते.. हे चित्र बेंगळुरू येथील आहे.. धिक्कार!धिक्कार! उठ मराठ्या ऊठ!!'' असे ट्विट त्यांनी केले आहे.

<div class="paragraphs"><p> Eknath Shinde&nbsp;</p></div>
मुख्यमंत्री रात्री विधानभवनात..CCTV बंद, काय सिक्रेट?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com