Eknath Shinde
Eknath Shinde Sarkarnama

maharashtra political crisis : ठाकरे सरकारचा पाठिंबा काढला

सोळा बंडखोर आमदारांनी सदस्यत्व रद्द करण्याबाबत उपसभापतींच्या नोटीसला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

एकनाथ शिंदे गटाविरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका. कर्तव्य सोडून आमदार सुट्टीवर गेल्याचा याचिकाकर्त्यांचा दावा.

कोल्हापुरात शिवसैनिक आक्रमक,  बंडखोर यड्रावकरांच्या विरोधात शिवसैनिकांच्या मोर्चा

महाविकास आघाडी सरकारने बहुमत गमावलं आहे, त्यांनी बहुमत सिद्ध करावं, शिंदे गट हीच शिवसेना, असा दावा शिंदे गटानं केला आहे. 

शिंदे गटाच्या ५१ आमदारांनी पाठिंबा काढल्याचा दावा याचिकेमध्ये एकनाथ शिंदे गटाने केला आहे. 

एकनाथ शिंदे गटाने संजय राऊतांच्या प्रक्षोभक भाषणाच्या लिंक न्यायालयाकडे दिल्या आहेत.  

ठाकरे सरकारने बहुमत सिद्ध करावे, शिंदे गटाचं राज्यपालांना पत्र

शिंदे गटाने ठाकरे सरकारचा पाठिंबा काढला, याचिकेत दावा

पुण्यात शिवसैनिकांकडून बंडखोरांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा

देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर हालचाली वाढल्या

गिरीश महाजन सागर बंगल्यावर दाखल

गटनेता म्हणून अजय चौधरींच्या नियुक्तीला मान्यता देण्याच्या नरहरी झिरवळांच्या निर्णयाविरोधात स्वतः शिंदे यांनी याचिका दाखल केली आहे. सुप्रीम कोर्टाने तातडीनं सुनावणी घेण्याची विनंती मान्य केली असून यावर दोन्ही याचिकांवर आज एकाच वेळी सुनावणी होईल.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज संध्याकाळी मुंबईतील गोवंडी येथे सभेला संबोधित करणार आहेत. यामध्ये राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेही सहभागी होणार आहेत.

बंडाखोर आमदारांकडून 2 स्वतंत्र याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. या याचिकांवर आज सुनावणी होणार आहे. न्या. सूर्यकांत व न्या. जे. बी. पारदीवाला यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी आहे. (maharashtra political crisis)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sarkarnama
www.sarkarnama.in