ठाकरेंना सचिन वाझेचा अभिमान आहे का? भाजपचा सवाल

शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी जोरदार मांडणी केली. भाजपचे आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी ठाकरेंच्या भाषणावरुन टीका केली आहे.
 Uddhav Thackeray
Uddhav Thackeray sarkarnama

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी काल दसरा मेळाव्यात (shivsena dasara melava) भाजप आणि केंद्र सरकार यांना धारेवर धरले. स्वबळाचा नारा दिला. मराठी माणसाने भेदाभेद विसरावेत पण हिंदुत्वाचीही कास सोडू नये, असा सल्ला आजच्या दसरा मेळाव्यता दिला. शिवसेना पक्षप्रमुख म्हणून त्यांनी जोरदार मांडणी केली. या भाषणावर मात्र, भाजपने टीका केली आहे. भाजपचे आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी ठाकरेंच्या भाषणावरुन टीका केली आहे.

कालच्या मुख्यमंत्री यांच्या भाषणात केवळ आणि केवळ गुजरात, भाजप, मोदी आणि अमित शहा यांच्या द्वेषाची मळमळ भाषणातून जाहीर झाली. महाराष्ट्रातील पोलिसांचा तुम्हाला अभिमान आहे, कुठल्या वाझेचा का? असा सवाल उपस्थित करत, नवाब मलिक ड्रग्स पेडलरची वकिली करत आहेत त्यांचे समर्थन तुम्ही करत आहात असा आरोप खातखळकरांची मुख्यमंत्री ठाकरेंना केला आहे.

 Uddhav Thackeray
रामदास कदमांचा मुख्यमंत्र्यांवर 'लेटर बॉम्ब' ; मंत्र्यांविरोधात तक्रार

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यानिमित्त उद्धव ठाकरे यांनी आज जोरदार भाषण करत भाजप व केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. यास प्रत्यूत्तर म्हणून आमदार खातखळकरांची ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ''उद्धव ठाकरे यांचे भाषण हे भाजप द्वेषाची मळमळ होती. त्यापलीकडे राज्यातील जनता, शेतकऱ्यांसाठी शुन्य भाषण आहे,'' अशी टीका भातखळकरांनी केली आहे. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यानिमित्त शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जोरदार भाषण करत भाजप व केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. यास प्रत्यूत्तर म्हणून आमदार खातखळकरांची ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

 Uddhav Thackeray
''माझ्या जीवात जीव असेपर्यंत पंकजा मुंडेंना सोडणार नाही : महादेव जानकर

उद्धव ठाकरे यांनी आजच्या भाषणात भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. याला भातखळकरांनी प्रत्यूत्तर दिलं आहे. ''आता तर ठाकरे यांना 'भारतमाता की जय' या घोषणेचे सुद्धा तुम्हाला वावडे झाले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून तुम्ही बोलत होता की शिवसेनेचे पक्ष प्रमुख म्हणून तुम्ही बोलत होता हे समजले नाही. ना पक्षाबद्दल बोलला ना महाराष्ट्रा बद्दल बोललात,'' अशी टीका त्यांनी केली.

भातखळकर म्हणाले, राजनाथसिंग यांच्याबद्दल बोलणारे मुख्यमंत्री ठाकरे यांना सावरकराना त्यांच्या आरोप करणाऱ्यांना एफआयआर करण्यासाठी देखील तुम्ही मुख्यमंत्री पद जाईल म्हणून घाबरलात. तुम्ही भाजपच्या उपऱ्यांची चिंता करता मग प्रियंका चतुर्वेदी कोण आहेत ? असे तुम्ही किती उपरे आणलेत असा सवालही त्यांनी केला. देगलूरची जागा स्वतःकडे असताना ती काँग्रेसच्या पायी तुम्ही अर्पण केली, त्यावर बोला असे आवाहन त्यांनी केले.

विजयदशमी निमित्त दरवर्षी होणारा शिवसेनेचा दसरा मेळावा, यंदा कोरोना नियंत्रणात आल्याने ऑनलाइन ऐवजी थेट घेण्यात आला. मात्र, उपस्थितीच्या मर्यादेमुळे शिवाजी पार्कऐवजी षण्मुखानंद सभागृहात पार पडला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह रश्मी ठाकरे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आणि शिवसेना नेते, पदाधिकारी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com