Shivsena| न्यायालयाच्या नसबंदीने वासू-सपना सरकारवर अशी वेळ; शिवसेनेचा टोला

Shivsena| महाराष्ट्रावर धोक्याची गिधाडे फडफडत आहेत, पण महाराष्ट्र नाउमेद होणार नाही, लढत राहील!
CM Eknath Shinde| Devendra Fadanvis
CM Eknath Shinde| Devendra Fadanvis

मुंबई : राज्यातील सत्तांतराने शिवसेनेत मोठी पोकळी निर्माण झाली आहे. तर राज्यातील नव्या सरकारने आपल्या कामाला सुरुवातही केली आहे. पण नव्या सरकारमध्ये फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) हे दोघेच सध्या राज्याचा कारभार पाहत आहेत. यावरु आता शिवसेनेनसह विरोधी पक्षांनी टिकेची झोड उठवली आहे. अशात शिवसेनेने सामना'च्या संपादकीयमधून शिंदे-फडणवीस सरकारवर पुन्हा निशाणा साधला आहे.

''महाराष्ट्रात सध्या असलेले फडणवीस-शिंदे हे दोघांचेच सरकार व दोघांचेच मंत्रिमंडळ हा एक अनोखा प्रयोग म्हणायला हरकत नाही. राजकीय कुटुंब नियोजन म्हणायचे ते हेच, पण सर्वोच्च न्यायालयाने सक्तीची नसबंदी केल्यानेच वासू-सपना सरकारवर ही वेळ ओढवली आहे. पंगत मांडलीय, मांडव सजलाय, पण बँडबाजा-वरात रस्त्यात अडकली,'' असल्याचे म्हणत खोचक टिका केली आहे.

CM Eknath Shinde| Devendra Fadanvis
एकामागोमाग एक झटके बसल्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांची शिंदे-फडणवीसांकडे धाव

''या ‘प्रेमरोगा’ने वासू-सपनाच्या राजकीय संसाराचे काय व्हायचे ते होईल, पण महाराष्ट्राच्या बाबतीत वेडेवाकडे घडवू पाहणार असतील तर ते सहन करता येणार नाही. महाराष्ट्रावर धोक्याची गिधाडे फडफडत आहेत, पण महाराष्ट्र नाउमेद होणार नाही, लढत राहील!,'' असा विश्वासही शिवसेनेने व्यक्त केला आहे.

''शिंदे-फडणवीस यांचे सरकार अस्तित्वात नाही. ‘एक दुजे के लिये’ चित्रपटातील ‘वासू-सपना’ या प्रेमवीरांप्रमाणे हे दोघेच फिरतात, मजा मारतात, गाणी गातात, बागडतात. एकंदरीत त्यांच्या जीवनात नव्याने फुलबाग बहरली आहे, पण चित्रपटाच्या पडद्यावरील वासू-सपनाचे प्रेम अस्सल होते. तसे या वासू-सपनाचे आहे काय? स्वार्थ, दगाबाजीच्या पायावर त्यांचे नाते उभे आहे. त्यांची ‘आशिकी’ सत्तेची आहे. त्यांना खुर्चीचा ‘प्रेमरोग’ जडला आहे. खुर्चीलाच ‘अनारकली’ मानून त्यांच्या प्रेमाचे जप-जाप सुरू,'' असल्याचा टोलाही शिवसेनेने लगावला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in