'छत्रपती शिवराय हा आत्मा, महाराष्ट्राचा हा आत्मा विकू नका!'

Thackeray-BJP Politics| हर हर महादेव चित्रपटावरुन राज्यात मोठा वादंग निर्माण झाला.
Thackeray-BJP Politics|
Thackeray-BJP Politics|

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची मोडतोड करणाऱ्या अडाणी उपटसुंभांची मनमानी महाराष्ट्र सहन करणार नाही. महाराष्ट्रात ‘जेम्स लेन्स’चे प्रकरण याआधी घडले आहे, पण अनेक देशी ‘जेम्स लेन्स’ या मातीत उपटले आहेत. त्यांच्यासाठी इतिहास हा पोटापाण्याचा धंदा बनला असेलही, पण महाराष्ट्रासाठी छत्रपती शिवराय हा आत्मा आहे. महाराष्ट्राचा हा आत्मा विकू नका!'' अशा शब्दांत दैनिक सामनातून उद्धव ठाकरेंनी पुन्हा सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे.

हर हर महादेव चित्रपटावरुन राज्यात मोठा वादंग निर्माण झाला. जितेंद्र आव्हाड यांनी चित्रपटगृहात घुसून आंदोलन केल्याने त्यांना अटक झाली आणि काही तासांनी त्यांची सुटकाही करण्यात आली. आव्हाड यांनी या चित्रपटातील काही त्रुटी लक्षात आणून दिल्या. यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमधील राजकारण शिगेला पोहचलं आहे.

Thackeray-BJP Politics|
Mid-term elections : 'जानेवारीत निवडणुका लागणार': राज ठाकरेंकडून मध्यावधीचे संकेत..

महाराष्ट्राची दोनच दैवते आहेत. छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर. दोन्ही दैवतांना महाराष्ट्रच नव्हे, तर देश सदैव पुजत असतो. या दैवतांच्या प्रतिमा आणि श्रद्धांना कोणी तडे दिले तर महाराष्ट्र खवळून उठतो. आताही इतिहासाच्या विकृतीकरणाविरुद्ध राज्याचे वातावरण तापले आहे. ‘हर हर महादेव’ नामक चित्रपटात इतिहासाचे विकृतीकरण म्हणजे छत्रपती शिवरायांचा इतिहास चुकीच्या पद्धतीने दाखवला गेल्याचा आक्षेप आहे. या चित्रपटातील ऐतिहासिक प्रसंग कसे चुकीचे आहेत याबाबत एक यादीच जाहीर करण्यात आल्याचं ठाकरेंनी म्हटलं आहे.

चित्रपट व नाटकांसाठी एक सेन्सॉर मंडळ आहे. ते सर्व तथ्यांची तपासणी करून चित्रपट प्रदर्शनास मान्यता देत असते. ते सेन्सॉर बोर्डही अशा प्रसंगी आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जाते. हे फक्त इतिहासाच्याच बाबतीत होते काय, तर तसेही नाही. राज्यकर्ते बदलताच श्रद्धास्थाने बदलतात, तसे इतिहासाचे संदर्भही बदलले जातात. महात्मा गांधी हे मागे पडतात व सरदार पटेल, सुभाषचंद्र बोस पुढे येतात. वीर सावरकर फक्त नाव घेण्यापुरते राहतात. पंडित नेहरू तर खिजगणतीत राहत नाहीत. कारण नवा इतिहास लिहिला जातो व तो सोयीनुसार लिहिला जातो,

Thackeray-BJP Politics|
Gujarat Elections 2022 : आपकडून मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराची घोषणा ; 'हे' असतील उमेदवार

छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या इतिहासाचा कळस रचला त्याची मोडतोड ‘गल्लाभरू’ चित्रपटांसाठी केली जाऊ नये. छत्रपती शिवराय जन्मले त्या काळात संपूर्ण भारतवर्ष वणव्याप्रमाणे पसरत चाललेल्या मोगलांच्या सत्तेपुढे हतबल होत चालले होते. त्यातच सागरसीमेकडून पोर्तुगाल आदी युरोपीय राष्ट्रे भारताला सत्ताप्रसार व धर्मप्रसार यांच्या जबडय़ात पकडून मगरीप्रमाणे ग्रासू पाहत होती. अशा दुहेरी संकटाच्या कात्रीत सापडलेल्या भारतासाठी तो निराशामय काळ होता. सामान्य जनांच्या मनातून भारताच्या पुनर्निर्माणाची आशा जणू मावळली होती. अशा वेळी राष्ट्राच्या उद्धारासाठी छत्रपती शिवाजी महाराज उभे ठाकले. भय व निराशा यांची जळमटे जनमनातून जाळून टाकणारे दिव्य व दाहक तेज मनुष्यरूपाने प्रकट झाले! हा इतिहास आहे व तो तसाच राहील, असा विश्वास ठाकरेंनी व्यक्त केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in