आमच्याकडे शिवसेना म्हणून पाहू नका ; कोर्टानं नक्की कोणाला दिलासा दिला ? सावतांचा सवाल

अध्यक्षांनी आमच्या बाजूने निर्णय दिला असता का हा वेगळा प्रश्न आहे. पण सरकार तसंच राहणार का?
Arvind Sawant
Arvind SawantSarkarnama

मुंबई : शिवसेनेतून (shivsena) बंड केलेल्या १६ आमदारांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाशिवाय आमदारांवर कोणतीही कारवाई करु नये, अशी सूचना सरन्यायाधीश एन व्ही रमणा यांनी विधानसभा अध्यक्षांना केली आहे. (Arvind Sawant news update)

सरन्यायाधीशांच्या या निर्णयामुळे शिंदे गटातील बंडखोर आमदारांना एका प्रकारे दिलासाच मिळाला आहे. यावर शिवसेनेकडून प्रतिक्रिया आली आहे. सुप्रीम कोर्टाकडून हे अपेक्षित नाही, असे शिवसेनेचे नेते अरविंद सावंत (arvind sawant) यांनी सांगितली. या निर्णयावर त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सावंत माध्यमांशी बोलत होते.

“कायद्याची पायमल्ली होत असताना सुप्रीम कोर्ट आणि सगळेच शांत आहेत. अध्यक्षांनी निर्णय घेऊ नये सांगत सुप्रीम कोर्टाने नक्की कोणाला दिलासा दिला आहे?,” अशी विचारणा अरविंद सावंत यांनी केली आहे," असा सवाल अरविंद सावंत यांनी उपस्थित केला आहे.

"आम्ही सुप्रीम कोर्टाकडे एकमेव आशा म्हणून पाहत आहोत. आमच्याकडे शिवसेना म्हणून पाहू नका, पण देशाच्या संविधानाच्या पायावर घाव घातला जात आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये असंच घडलं होतं,” असं सावंत म्हणाले.

Arvind Sawant
Vijay Mallya : मल्ल्याला कोर्टाचा दणका ; 4 महिन्यांचा तुरुंगवास, 2 हजारांचा दंड ठोठावला

सावंत म्हणाले, "अध्यक्षांनी आमच्या बाजूने निर्णय दिला असता का हा वेगळा प्रश्न आहे. पण सरकार तसंच राहणार का? बेकायदेशीरपणे निर्माण झालेल्या सरकारला ज्या प्रकारे संरक्षण दिलं जात आहे आणि वेळकाढूपणा केला जात आहे, न्याय देण्यास उशीर करणं हे सुप्रीम कोर्टाकडून अपेक्षित नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं आहे, त्याच्या मुळावर घाव घालण्याचं काम सुरु आहे, त्याची जास्त चिंता वाटत आहे. उद्धव ठाकरेंनीही तीच चिंता व्यक्त केली आहे,”

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in