खासदार राणांना VVIP उपचार : शिवसेनेचे लीलावती रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप

Navneet Rana | Ravi Rana : राणा यांचे एमआरआय करतेवेळचे फोटो व्हायरल
CM Uddhav Thackeray, Ravi Rana, Navneet Rana
CM Uddhav Thackeray, Ravi Rana, Navneet RanaSarkarnama

मुंबई : अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांना सध्या लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. गुरुवारपासून त्यांच्यावर स्पॉन्डॅलिसिसचे उपचार सुरु होते. राणा यांना तुरुंगातून बाहेर मानदुखीचा त्रास सुरू झाला होता. काल राणा यांचे MRI स्कॅन आणि फुल बॉडी चेकअप करण्यात आले. मात्र नवनीत राणा यांच्या ऑफिसने MRI करतेवेळचे फोटो व्हायरल केल्याने त्यांना ट्रोलिंगला सामोरे जावे लागले आहे. तसेच फोटो काढण्याची परवानगी दिल्याने लिलावती हॉस्पिटल प्रशासनाला देखील टीकेचे धनी व्हावे लागले आहे.

सोशल मिडीया पाठोपाठ आता शिवसेनेने देखील राणा दाम्पत्याला VVIP उपचार मिळत असल्याचा आरोप केला आहे. तसेच लीलावती हॉस्पिटल आणि राणा यांचे काही साटेलोटे आहे का? लीलावती हॉस्पिटल प्रशासन भाजपच्या दबावाखाली काम करत आहे का? असे सवालही शिवसेना प्रवक्त्या आणि विधान परिषद सदस्या प्रा. डॉ. मनीषा कायंदे यांनी विचाराले आहेत.

CM Uddhav Thackeray, Ravi Rana, Navneet Rana
MRI चे फोटो व्हायरल केल्याने राणा दाम्पत्य ट्रोल; लिलावती हॉस्पिटल प्रशासनावरही टीका

काय म्हणाल्या मनिषा कायंदे?

आजपर्यंत अनेक VVIP रुग्ण उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाले आहेत. पण कधीही मीडिया किंवा थेट कॅमेराला रुग्णाच्या वार्डात प्रवेश नसायचा. रुग्णालय प्रशासनाकडून मेडिकल बुलेटिन जारी केले जायचे. सर्वत्र हीच पद्धत असताना लीलावती हॉस्पिटल प्रशासन राणा दाम्पत्य आणि भाजपला शरण गेले आहे का? की भाजपने लीलावती रुग्णालय आणि संबंधित ट्रस्ट विकत घेतला आहे? वॉर्डमध्ये असंख्य राजकीय नेत्यांचा वावर, सोबत कॅमेरा आणि अन्य व्यक्ती यामुळे वार्डात जंतू संसर्ग होणार नाही का? पाठीचे दुखणे तसे गंभीर नसते. पाठ दुखी झालेल्या खासदार राणा एकट्या नाहीत, अनेकांना ती होते, पण सगळ्यांनाच अशी VVIP सेवा का मिळत नाही? असे सवालही कायंदे यांनी विचारले आहेत.

काय झाले होते काल?

ANI वृत्तसंस्थेने त्यांच्या ट्विटर हॅन्डेलवरती खासदार राणा यांच्या ऑफिसच्या वतीने MRI करतेवेळचे फोटो शेअर केले होते. त्यानंतर युजर्सनी राणा आणि हॉस्पिटल प्रशासनावरती टीका करायला सुरुवात केली. लिलावती हॉस्पिटल लॅबच्या आतमध्ये फोटो काढण्यासाठी माध्यमांना परवानगी देते का? असा सवाल विचारला आहे. तसेच हे सुरक्षा मानकांचे उल्लंघन नाही का? असा सवालही काही युजर्सनी विचारला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com