शिवसेनेच्या ३९ आमदारांची बंडखोरी : मग नोटीस १६ जणांनाच का? 'मविआ'चा नेमका प्लॅन काय?

Shivsena | Mahavikas Aaghadi | महाविकास आघाडीला बंडखोर आमदारांना धडा शिकवायचा आहे पण सरकार देखील वाचावायचे आहे...
Mahavikas Aghadi
Mahavikas Aghadisarkarnama

मुंबई : शिवसेनेचे ३९ वे आमदार आणि राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत (Uday Samant) हेही बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाले आहेत. काल संध्याकाळपासून नॉट रिचेबल असलेले सामंत दुपारनंतर गुवाहटीला रवाना झाले. त्यामुळे सामंंत यांच्यासह शिंदे (Eknath Shinde) गटातील अपक्षांसह आमदारांची संख्या आता ४८ वर गेली आहे. दरम्यान इकडे महाराष्ट्रात शिवसेनेकडून या सर्व बंडखोर आमदारांवर कायदेशीर कारवाई सुरु करण्यात आली असून यापैकी १६ जणांना विधान सभा उपाध्यक्षांसह अपात्रतेची नोटीस देण्यात आली आहे. (Eknath Shinde | Shivsena Latest News)

मात्र केवळ अपत्रातेच्या कारवाईची नोटीस केवळ १६ जणांनाच का? उर्वरित बंडखोरांवर कारवाई का करण्यात आली नाही? यामागे देखील महाविकास आघाडीचा काही प्लॅन असू शकतो का? अशा प्रकारचा प्रश्न सध्या समाजमाध्यमांवर विचारला जात आहे.

तर निलंबनाचा प्रस्ताव दिलेल्या १६ जणांवरील कारवाई ही पहिल्या टप्प्यातील कारवाई असल्याचे सांगण्यात येत आहे. शिवाय महाविकास आघाडीने १६ जणांचा आकडा निवडताना देखील बराच विचार केलेला दिसून येत आहे. कारण जरी हे १६ जण अपक्ष ठरले तरी सरकारला कोणताही धोका निर्माण होणार नाही याची काळजी घेतल्याचे स्पष्ट होत आहे. ५५ पैकी १६ जण अपात्र ठरल्यास शिवसेनेचा आकडा ३९ वर येतो. तर बहुमताचा आकडा १३६ वर येतो. अशा परिस्थितीमध्ये शिवसेनेचे ३९ + राष्ट्रवादी काँग्रेसचे ५३ + काँग्रेसचे ४४ असा तिघांचा मिळून अकडा १३६ येतो.

त्यामुळे विश्वासदर्शक ठराव संमत करण्याची वेळ आल्यास ज्या आमदारांना व्हीप काढून मतदान करण्यासाठी बोलावू शकतो अशा हक्काच्या आमदारांची संख्या १३६ वर येते. यात शिवसेनेच्या अपक्षांनी पाठिंबा काढला तरी अद्याप क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे आमदार शंकरराव गडाख, राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा दिलेले ३ अपक्ष आणि काँग्रेसला पाठिंबा दिलेले समाजवादी पक्षाचे २ अशा ६ जणांचाही सरकारला पाठिंबा कायम आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारकडे हे १६ जण अपात्र ठरले तरी १४२ आमदारांचा पाठिंबा कायम आहे. एकूणच १६ जणांना अपात्रतेची नोटीस देताना महाविकास आघाडीने बहुमताच्या गणिताचीही काळजी घेतलेली दिसून येत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com