Shivadi Court Fines Sanjay Raut: खासदार संजय राऊतांना शिवडी न्यायालयाचा दणका

Shivadi Court Fines Sanjay Raut: संजय राऊतअब्रूनुकसानी याचिका प्रकरण
Sanjay Raut
Sanjay Raut Sarkarnama

Shivadi Court Fines Sanjay Raut: शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना शिवडी न्यायालयाने दणका दिला आहे. बदनामी केल्याप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्या पत्नी मेधा सोमय्या (Medha Somaiya) यांनी संजय राऊतांनविरोधात शिवडी कोर्टात याचिका दाखल केली होती. कोर्टानं समन्स बजावूनही संजय राऊत आज कोर्टात हजर झाले नसल्याने न्यायालयाकडून एक हजार रुपये दंड आकारण्यात आला आहे.

Sanjay Raut
Karuna Sharma Allegations On Dhananjay Munde : कोट्यावधींच्या पॉलिसीचा उल्लेख करत करुणा मुंडेंचे धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप

नेमकं प्रकरण काय?

मीरा भाईंदर शहरात 154 सार्वजनिक शौचालय बांधण्यात आली आहेत. त्यातील 16 शौचालय बांधण्याचं कंत्राट मेधा सोमय्या यांच्या युवक प्रतिष्ठानला मिळालं होतं. बनावट कागदपत्रं सादर करून हे कंत्राट मिळवल्याचा आरोप राऊत यांनी केला होता. “मिरा-भाईंदर महापालिका क्षेत्रात सार्वजनिक शौचालयांची उभारणी आणि देखभालीच्या प्रकल्पात युवा प्रतिष्ठान या संस्थेने शंभर कोटी रुपयांचा घोटाळा केला होता,” असा आरोप संजय राऊत यांनी केला होता.

कोणताही पुरावा नसताना राऊतांकडून बदनामीकारक वक्तव्य केली जात असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली होती. मात्र, पोलिसांनी कोणतीही कारवाई न केल्याने त्यांनी शिवडी न्यायालयात धाव घेतली होती.

Sanjay Raut
MVA Vs BJP : छत्रपती संभाजीनगरचं राजकारण तापणार; एकाच दिवशी आघाडीची सभा अन् भाजपची सावरकर गौरव रॅली

कोर्टात आजही सुनावणी असतांना संजय राऊत गैरहजर हाते, त्यामुळे राऊत यांच्या वकिलांकडून न्यायालयीन कामकाजात गैरहजर राहण्याचा अर्ज करण्यात आला, मात्र न्यायालयाने तो मान्य न करता हजार रुपयांचा दंड संजय राऊत यांना ठोठावला आहे. या याचिकेवर पुढील सुनावणी 10 एप्रिल ला होणार आहे.

काय दिलीय पोलिसांत तक्रार?

मेधा सोमय्या यांनी राऊत यांच्याविरोधातील तक्रार अर्ज मुंलुंडमधील नवघर पोलीस ठाण्यात दिला आहे. राऊतांवर त्यांनी धमकावण्याचे आरोप केले आहेत. त्यांच्याविरोधात आयपीसी कलम 503, 506 आणि 509 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी अर्जात करण्यात आली होती. राऊत यांनी माध्यमांमध्ये दुर्भाग्यपूर्ण आणि अयोग्य भाष्य केले आहे. त्यांनी केवळ आपले चारित्र्यहनन केले नाही तर मला घाबरवले आणि धमकावलेही, असे तक्रार अर्जात म्हटले होते.

Sanjay Raut
Cyber Fraud With Mokshada Patil: सायबर चोरट्यांचा थेट डॅशिंग महिला आयपीएस अधिकाऱ्यालाच गंडा, काय आहे प्रकरण?

याआधी मेधा सोमय्या यांनी राऊतांना मानहानीची नोटीस पाठवली होती. राऊतांनी 48 तासांत माफी मागितली नाही, तर कायदेशीर कारवाई करू, असे नोटीसीमध्ये म्हटले होते. त्यानंतर त्यांनी न्यायालयात दावा दाखल केला होता. .

दरम्यान, संजय राऊत यांनी सोमय्या कुटुंबावर अनेक आरोप केले आहेत. त्याचे पुरावे त्यांनी द्यावे, अन्यथा माफी मागणी, असे मेधा सोमय्या यांनी पाठवलेल्या नोटीसीमध्ये म्हटले होते. त्याच बरोबर राऊत यांनी केलेला 100 कोटी रुपयांच्या शौचालय घोटाळ्याचा आरोप बदनामीकारक असून ते पूर्णपणे खोटे आहेत, असा दावाही त्यांनी केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com