बंडामागचं नेमकं कारण काय? प्रताप सरनाईकांनी थेट विधानसभेतच मन मोकळं केलं...

ईडीच्या कारवाईमुळे शिंदे गटात सामील झाल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.
Pratap Sarnaik Latest Marathi News
Pratap Sarnaik Latest Marathi NewsSarkarnama

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह शिवसेनेतील 40 आमदारांनी बंड केल्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळलं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले. त्यानंतर आता बंडखोर आमदारांनी आपल्या भावना व्यक्त करण्यास सुरूवात केली आहे. काही आमदारांनी तर सोमवारी विधानसभेतच आपलं मन मोकळं केलं. (Pratap Sarnaik Latest Sarnaik)

बंडखोर आमदारांमध्ये ठाकरे यांचे अत्यंत निकटवर्ती आमदार प्रताप सरनाईक यांचाही समावेश आहे. ईडीच्या कारवाईमुळेच सरनाईक यांनी बंड केल्याचा दावा शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यासह इतर नेत्यांकडूनही केला जात आहे. विधानसभेत मतदानावेळी सरनाईक उभे राहिले तेव्हा विरोधकांकडून ईडी, ईडी च्या घोषणा देण्यात आल्या. त्यावेळी सरनाईक यांनी नंतर उत्तर देतो, असं सांगितले.

Pratap Sarnaik Latest Marathi News
शिंदे गटाची आदित्य ठाकरेंवर मेहेरबानी; बाळासाहेबांचे नातू असल्यानं घेतला मोठा निर्णय

आपलं मनोगत व्यक्त करताना सरनाईक यांनी अनेक गोष्टींचा उलगडा केला. ठाकरे यांच्या जवळचा नेता म्हणून आपली ओळख होती, असं सांगत सरनाईक म्हणाले, ईडीची कारवाई सुरू झाल्यानंतर आपल्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यावेळी मिळालेली वागणूक न सांगण्यासारखी आहे. त्यावेळी मला आधाराची गरज होती. पण सगळेच साथ सोडून गेले. या काळात दुय्यम वागणूक मिळाल्याने हा काळच बंडासाठी कारणीभूत ठरल्याचे सरकानाईक यांनी स्पष्ट केलं.

सरनाईक एकढ्यावरच थांबले नाहीत. ठाकरे कुटुंबीयांशी असलेल्या कौटुंबिक संबंधांवर बोलतानाही त्यांनी नाराजी व्यक्त केली. सरनाईक आणि ठाकरे कुटुंबीयांमध्ये अत्यंत जवळचे संबंध होते. राजकारणापलिकडे हे संबंध होते. पण असे असूनही ठाकरे कुटुंबाकडून अपेक्षित सहकार्य मिळाले नाही, त्यामुळे हा सरनाईक यांना हा टोकाचा निर्णय घेतला. पण त्यानंतरही ठाकरे यांच्यावर नाराज नसल्याचे सरनाईक यांनी सांगितले.

Pratap Sarnaik Latest Marathi News
'राष्ट्रवादी'च्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच असं घडलं अन् अजितदादांना मिळाला पहिला मान!

शिंदे गटाकडून आदित्य ठाकरेंना अभय?

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेतील 40 आमदारांनी केलेल्या बंडांमुळे राज्याचं राजकारण ढवळून निघालं. विधिमंडळातील खरी शिवसेना कोणती, प्रतोद, गटनेता कोण हा वाद सर्वोच्च न्यायालयात पोहचला. विधानसभेच्या विशेष अधिवेशनात शिंदे गट व शिवसेनेने एकमेकांविरोधात व्हीप काढले. आता दोन्ही बाजूंकडून व्हीप झुगारलेल्या आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी विधानसभा अध्यक्षांकडे करण्यात आली आहे.

शिंदे गटाने शिवसेनेतील 15 पैकी 14 आमदारांवर कारवाईची मागणी केली आहे. विशेष म्हणजे त्यातून आदित्य ठाकरे यांचे नाव वगळण्यात आलं आहे. शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी अध्यक्षपदाची निवडणूक व बहुमत चाचणीसाठी व्हीप काढला होता. शिवसेनेच्या सर्व आमदारांनी राहुल नार्वेकर यांना मतदान करावे तसेच बहुमत चाचणीवेळी सरकारच्या बाजूने मतदान करण्याचे सांगण्यात आले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com