राजेश क्षीरसागर, रवींद्र फाटक यांना मिळणार आमदारकीचं बक्षीस?

दोघेही नेते एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले आहेत.
Ravindra Phatak Larest News, Rajesh Kshirsagar Latest News
Ravindra Phatak Larest News, Rajesh Kshirsagar Latest NewsSarkarnama

मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे निकटवर्ती मानले जाणारे नेते रवींद्र फाटक (Ravindra Phatak) आणि ठाकरेंनी समजूत काढल्याने कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीत तलवार म्यान केलेले राजेश क्षीरसागर यांना आमदारकीची लॉटरी लागण्याची शक्यता आहे. दोन्ही नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटात सामील झाले आहेत. त्याचं बक्षिस म्हणून त्यांना विधान परिषदेची आमदारकी दिली जाऊ शकते. (Rajesh Kshirsagar Latest News)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेतील 39 बंडखोर आमदार भाजपसोबत गेल्याने महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं आहे. त्यानंतर झालेल्या विशेष अधिवेशनात विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त बारा आमदारांच्या निवडीवरून आघाडीतील नेत्यांनी जोरदार टोलेबाजी केली.

Ravindra Phatak Larest News, Rajesh Kshirsagar Latest News
भाजप विधान परिषदेतही शिवसेनेला दाखवणार आसमान?

भाजप व शिंदे गटाकडून सुधारित यादी राज्यपालांना पाठवली जाऊ शकते. या यादीत क्षीरसागरफाटक यांच्या नावांचा समावेश होऊ शकते. फाटक हे विधान परिषदेचे आधीही सदस्य होते. पण नुकताच त्यांचा कालावधी संपला. त्यांना पुन्हा संधी मिळाली नाही. नाराज शिंदे यांची मनधरणी करण्यासाठी ते मिलिंद नार्वेकर यांच्यासोबत सूरतला गेले होते. त्यानंतर ते परत आलेच नाहीत.

कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत राजेश क्षीरसागर यांनी बंडाचा पवित्रा घेतला होता. पण ठाकरेंनी मध्यस्थी केल्यानंतर त्यांनी माघार घेतली. पण हा मतदारसंघ काँग्रेसला गेल्याने त्यांच्या मनात नाराजी होतीच. शिंदे यांच्या बंडानंतर ही नाराजी उघडपणे बाहेर आली आणि त्यांनी शिंदे गटाचा रस्ता धरला. ते नियोजन मंडळाचे अध्यक्ष आहेत.

Ravindra Phatak Larest News, Rajesh Kshirsagar Latest News
एकनाथजी, फक्त माझ्या कानात सांगितलं असतं तर..! अजितदादांनी आदित्य ठाकरेंनाही टाकलं पेचात

विधान परिषदेतील पक्षनिहाय संख्याबळ -

भाजप - 24

शिवसेना - 11

राष्ट्रवादी काँग्रेस - 10

काँग्रेस - 10

राष्ट्रीय समाज पक्ष - 1

लोकभारती - 1

पीझंट्स अॅण्ड वर्कर्स पार्टी ऑफ इंडिया - 1

अपक्ष - 4

रिक्त - 16

एकूण - 78

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com