Shivsena News : शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक सुरू; 'हे' निर्णय होण्याची शक्यता

Eknath Shinde : राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीत काय होणार?
Eknath Shinde, Shivsena
Eknath Shinde, Shivsena Sarkarnama

Maharashtra Politics : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला मिळाल्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेची आज पहिली राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक मुंबईत पार पडत आहे.

या बैठकीमध्ये शिवसेनेच्या कार्यकारणीच्या निवडीबाबत चर्चा होणार आहे. या बैठकीला शिवसेनेचे नेते आणि उपनेते उपस्थित आहेत. यावेळी पक्षाच्या घटनेवर देखील चर्चा होण्याची शक्यता आहे.

याबरोबरच शिवसेनेच्या पक्षप्रमुखपदाबाबत आणि कार्याध्यक्ष तसेच पक्षातील काही प्रमुख पदाबाबत चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

Eknath Shinde, Shivsena
NDCC Bank News; दादा भुसेंनी उलटवली प्रशासक कदमांची ‘चाल’

राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीत काय होणार?

- राष्ट्रीय कार्यकारिणीच्या आजच्या बैठकीत एकनाथ शिंदे यांची मुख्यनेतेपदी निवड होण्याची शक्यता.

- 1998 साली बाळासाहेबांनी केलेल्या घटनेनुसारच पक्षात काम चालेल की घटनेत काही बदल केला जाणार का याबाबत निर्णय.

- कार्याध्यक्ष आणि पक्षप्रमुख ही पदं रद्द केली जाण्याती शक्यता.

- सर्व अधिकार राष्ट्रीय कार्यकारिणीला देण्याचा निर्णय होण्याची शक्यता.

- याबरोबरच अभिनंदनाचा प्रस्ताव या कार्यकारिणीच्या बैठकीत आणण्याची शक्यता.

- संसदीय दल, लोकसभा ग्रूप लीडर, सरचिटणीस, कोषाध्यक्ष अशा पदांची निवड केली जाण्याची शक्यता.

Eknath Shinde, Shivsena
Patole On Chavan : अशोक चव्हाणांवर पाळत का ठेवली जात आहे? : नाना पटोलेंचा शिंदे-फडणवीसांना सवाल

दरम्यान, शिवसेना मिळाल्यानंतर एकनाथ शिंदे हे ॲक्शन मोडवर आले असून या पार्श्वभूमीवरच आज राष्ट्रीय कार्यकारणीची महत्वाची बैठक मुंबईत पार पडत आहे. शिवसेनेची पुढची वाटचाल कशी असेल? या विषयीची चर्चा होण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com