शिवसेनेचे पहिले आमदार वामनराव महाडिक यांच्या कन्येचा शिंदे गटात प्रवेश!

Vamanrao Mahadik : पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला हा आणखी एक मोठा धक्का मानला जातो.
Hemangi Mahadik
Hemangi MahadikSarkanama

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी परळ विधानसभा मतदासंघाची पोटनिवडणूक  'धर्मयुद्ध' म्हणून लढली होती. इथे वामनराव महाडिक यांचा विजय होऊन, शिवसेनेच्या पहिल्या आमदाराचा महाराष्ट्राच्या विधानसभेत प्रवेश झाला. शिवसेनेचे पहिले आमदार म्हणून नोंद झालेले वामनराव महाडिक यांची कन्या हेमांगी महाडिक यांनी आता शिंदे गटात प्रवेश केला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला हा आणखी एक मोठा धक्का मानला जातो.

मुखमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी महाडीक यांचा प्रवेश झाला. "बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारांनी आम्ही पुढे जात आहोत. यामुळेच सगळे लोक आमच्यासोबत येत आहेत, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. कॉ. कृष्णा देसाई हे परळ मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून होते. 1970 च्या जूनमध्ये देसाईंची हत्या झाली आणि त्याच वर्षी म्हणजे 18 ऑक्टोबर 1970 रोजी परळच्या जागी पोटनिवडणूक जाहीर झाली.

Hemangi Mahadik
घोडगंगा साखर कारखाना वीज खरेदी करारावरुन भाजप-राष्ट्रवादीत जुंपली

या पोटनिवडणुकीत डाव्या पक्षाकडून देसाईंच्या पत्नीलाच म्हणजे सरोजिनी देसाईंना यांना उमेदवारी जाहीर केली. सरोजिनी देसाईंना समाजवादी आणि काँग्रेसनेही आपला पाठिंबा दिला होता. एकूण छोट्या मोठ्या अशा एकूण 13 पक्षांचा सरोजिनी देसाईंना समर्थन दिले होते. शिवसेनेकडून याच वेळी परळमधून विद्यमान नगरसेवक असलेले वामनराव महाडिक यांना उमेदवारी देण्यात आली. वामनराव महाडिक हे बाळासाहेब ठाकरेंचे अत्यंत विश्वासू म्हणून ओळखले जात होते.  

Hemangi Mahadik
मोठी बातमी : PFI संघटनेवर पाच वर्षांची बंदी : अन्य आठ संघटनांवरही मोठी कारवाई

जनसंघ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि स्वतंत्र पक्षाने महाडिक यांना पाठिंबा दिला होता. मुंबई महापालिकेत कारकून म्हणून काम करणाऱ्या वामनराव महाडिकांवर सुरूवातीच्या काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रभाव होता. मात्र, परळमधील बाळासाहेब ठाकरेंच्या एका सभेनंतर महाडिक शिवसेनेच्या विचारांनी प्रभावित झाले. त्यानंतर ते शिवसेनेत काम करू लागले. ते शिवसेनेचे पहिले आमदार तर होतेच, तसेच 1989 साली दक्षिण-मध्य मुंबईतून खासदारकीची निवडणूक जिंकून वामनराव महाडिकांनी शिवसेनेचे पहिले खासदार होण्याचा मानही मिळविला होता.

निष्ठावान म्हणून राहिलेले आणि शिवसेनेचे पहिले आमदार व खासदार म्हणून निवडून आलेले वामनराव महाडिक यांची कन्याच आता उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात दाखल झाल्याने हा शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला जातो.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com